Home /News /news /

UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन, AIIMSमध्ये सुरू होते उपचार

UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन, AIIMSमध्ये सुरू होते उपचार

दिल्ली येथे सोमवारी सकाळी निधन झाले. एम्सनुसार सीएम योगी यांच्या वडिलांनी सकाळी 10.45 वाजता अखेरचा श्वास घेतला.

    नवी दिल्ली, 20 एप्रिल : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचे वडील आनंदसिंग बिष्ट (Anand Singh Bisht) यांचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, दिल्ली येथे सोमवारी सकाळी निधन झाले. एम्सनुसार सीएम योगी यांच्या वडिलांनी सकाळी 10.45 वाजता अखेरचा श्वास घेतला. आता त्यांचा मृतदेह पंचूर (उत्तराखंड) या वडिलोपार्जित गावात आणला जात आहे. यासाठी तयारी सुरू आहे. सोमवारी बिष्ट यांचा मृतदेह उत्तराखंड इथे नेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), उत्तर प्रदेश, अवनीश के. अवस्तीने दिली आहे. आनंदसिंग बिष्ट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ते म्हणाले की, हा एक कठीण काळ आहे आणि आमचे सांत्वना मुख्यमंत्री सीएम योगी आदित्यनाथ सिंह यांच्याकडे आहेत. बाल्कनी, एक चिठ्ठी आणि लॉकडाऊन! पहिल्या नजरेत तरुणी घायाळ, असा सुरू झाला रोमान्स माहिती मिळाल्यानंतरही बैठक सुरू ठेवल्याने सीएम योगी आदित्यनाथ यांना टीम 11 च्या बैठकीत वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळाली. परंतु यावेळी त्यांचे लक्ष विचलित झाले नाही आणि त्याने आपले कार्य सतत सुरू ठेवले. कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी या बैठकीत त्यांनी आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. तथापि, यावेळी त्यांचे डोळे नक्कीच पाणावले होते. अक्षय तृतीयेआधी खरेदी करा स्वस्त सोनं, आजपासून मोदी सरकारची विशेष ऑफर हवाई रुग्णवाहिकेनं दिल्लीत आणली तत्पूर्वी, 89 वर्षीय आनंदसिंग बिश्ट यांची प्रकृती बिघडल्यानंतर उत्तराखंडमधील पौरी-गढवाल जिल्ह्यातील ग्राम पंचूर येथून एम्बुलेंसद्वारे एम्स दिल्लीत आणले होते. गेल्या एक महिन्यापासून, एम्सच्या एबी ए वॉर्डमध्ये दाखल असलेल्या योगी यांच्या वडिलांवर गॅस्ट्रो विभागातील डॉ. विनीत आहूजा यांच्या पथकाखाली उपचार सुरू होते. रविवारी अचानक त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्याला व्हेंटिलेटर लावण्यात आले. एम्समध्ये आणण्यापूर्वी त्यांना पौरी-गढवाल जिल्ह्यातील जॉली ग्रँटमधील हिमालयन रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दिल्ली येथे आणण्यात आले. दरम्यान, सीएम योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंग बिष्ट यांनी वनपरिक्षेत्री म्हणून आपली सेवा दिली होती. सेवानिवृत्तीनंतर तो आपल्या मूळ गावी राहत होता. पोलीस इंस्पेक्टरने स्वत:च्या मुलांना घातल्या गोळ्या; एकाचा मृत्यू, दोन तरुणी जखम
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या