बायकोवरच्या रागात बापाने 13 महिन्याच्या चिमुकलीचा फेकलं, उपचाराविनाच झाला मृत्यू

बायकोवरच्या रागात बापाने 13 महिन्याच्या चिमुकलीचा फेकलं, उपचाराविनाच झाला मृत्यू

पती-पत्नीच्या भांडणाच्या वेळी 13 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पत्नीने पतीविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:

नोएडा, 25 जुलै : पती आणि पत्नीच्या वादात अनेक गुन्हे घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशात उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पती-पत्नीच्या वादात 13 महिन्यांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीच्या भांडणाच्या वेळी 13 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पत्नीने पतीविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

हे प्रकरण नोएडाचं आहे. घरात पती-पत्नीचा एकमेकांशी वाद सुरू झाला. यामध्ये रागाच्या भरात पतीने आपल्या 13 महिन्यांच्या मुलीला जमिनीवर फेकलं. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली. यानंतर मुलीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण, जिल्हा रुग्णालयात मुलीला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

बिल ऐकून कोरोना रुग्ण गेला पळून, मुंबईत सगळ्यांना बाधित करण्याची धमकी

फार्म हाऊसलाच बनवला सेक्स रॅकेटचा मोठा अड्डा, 3 तरुणींसह 12 जणांना अटक

जखमी अवस्थेत मुलीला सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे मुलीवर उपचार होऊ शकले नाहीत. यानंतर सफदरजंग इथून मुलगी परत आणलं जात असताना वाटेतच तिचा जीव गेला. या प्रकरणात मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला आहे.

SEX रॅकेट चालवणाऱ्यावर सगळ्यात मोठी कारवाई, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मिळालेल्या माहितीनुसारह, मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईने तिच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी वडील जमदेशला अटक केली असून सध्या या प्रकरणात पुढील तपास सुरू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 25, 2020, 11:14 PM IST

ताज्या बातम्या