Home /News /news /

वडिलांनी पुतळ्यासोबत लावून दिलं मुलाचं लग्न, कारण ऐकून बसेल धक्का

वडिलांनी पुतळ्यासोबत लावून दिलं मुलाचं लग्न, कारण ऐकून बसेल धक्का

वडिलांनी आपल्या मुलाचं पुतळ्यासोबत का लावून दिलं लग्न काय आहे कारण जाणून घ्या.

    प्रयागराज, 19 जून : लग्न म्हटलं की वरातीपासून विधीपर्यंत सगळ्या गोष्टींचा उत्साह आणि आनंद असतो. आता एक लग्नाची तुफान चर्चा रंगली आहे. याचं कारणही तेवढंच खास आहे. वडिलांनी आपल्या मुलाचं लग्न पुतळ्यासोबत लावून दिल्याची घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे घडली आहे. या लग्नात वराती, विधी सगळ्या गोष्टी इतर लग्नांसारख्याच होत्या पण चर्चा होती ती वधूची. लग्नाचे विधी वधू ऐवजी पुतळ्यासोबत पूर्ण केल्याची माहिती मिळत आहे. प्रयागराज शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर घूरपूर भागातील भैदपूर गावात हे आगळवेगळं लग्न पार पडलं. 90 वर्षांचे शिवमोहन पाल यांच्या घरून मिरवणूक निघाली आणि गावातून फिरून घरी परत आली. यानंतर लग्नाचे विधी सुरू झाले. महिलांनी लग्नाची गाणीही म्हटलं. लग्नमंडपात विधी झाले आणि मुलाला पुतळ्यासोबत सात फेरे घेण्यासही सांगितले. हे वाचा-'...तर मीही आत्महत्या केली असती', सुशांत प्रकरणानंतर कंगना रणौतनं केला खुलासा शिवमोहन यांना 9 मुलं, तीन मुली आणि 5 मुलं. पंचराज वगळता बाकी सर्व मुलांचं शिक्षण आणि लग्न दोन्ही चांगल्या पद्धतीनं त्यांनी करून दिलं. शिवमोहन हे स्वत: उच्च शिक्षित असल्यानं त्यांना सरकारी नोकरीही होती. त्यांनी आपल्या मुलांना योग्य आणि चांगलं शिक्षणही दिलं. मात्र पंचराज शिकण्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे तो अशिक्षित राहिला. अशिक्षित असल्यानं त्याला कोणताही रोजगार मिळत नाही. त्यामुळे जनावरं सांभाळण्याचं काम पंचराज करत आहे. अशिक्षित आणि बेरोजगार असल्यानं वडिलांनी मुलाचं लग्न पुतळ्यासोबत लावून देत त्यांनी आपल्या धडा शिकवला आहे. अशिक्षित आणि बेरोजगार मुलाशी लग्न लावून मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नसल्यानं त्यांनी पुतळ्याशी आपल्या मुलाचं लग्न लावून देण्याचा हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. हे वाचा-सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडच्या 2 अभिनेत्यांची चौकशी होण्याची शक्यता संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या