VIDEO VIRAL : उत्तरप्रदेशातल्या जेलमध्ये गँगस्टरचं बर्थ डे सेलिब्रेशन !

VIDEO VIRAL : उत्तरप्रदेशातल्या जेलमध्ये गँगस्टरचं बर्थ डे सेलिब्रेशन !

फैजाबाद जेलमध्ये एका गँगस्टरने वाढदिवस साजरा करत केक कापला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

  • Share this:

फैजाबाद, ता.29 जुलै : उत्तरप्रदेशमधल्या जेलमधली सुरक्षाव्यवस्था किती रामभरोसे आहे याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. फैजाबाद जेलमध्ये एका गँगस्टरने वाढदिवस साजरा करत केक कापला. घरातल्या दिवाणखाण्यात ज्या पद्धतीने सजावट करून केक कापला जातो त्याच पद्धतीने या गँगस्टरने बर्थडे सेलिब्रेशन केलं. शिवेंद्र सिंह असं या गँगस्टरचं नाव असून हत्या आणि अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर आहे. काही दिवसांपूर्वीच शिवेंद्र जेलमध्ये आला होता. त्याचा फोटो असलेला केक, मेणबत्त्या, केक कापायला चाकू, मेणबत्या पेटवायला लायटर अशी साग्रसंगीत सोय करण्यात आली होती. मेणबत्या लावून त्यानं सहकाऱ्यांच्या शुभेच्छा घेत केक आपला आणि दुसऱ्या कैद्याच्या चेहेऱ्यावरही लावला. त्याच बरोबर या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओही बनवण्यात आला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर जाग आलेल्या प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले.

तर शिवेंद्रच्या वकिलाने जेल अधिकारी विनयकुमार दुबे यांच्यावरच गंभीर आरोप केले. दुबेने बर्थडे सेलिब्रेशन करू देण्यासाठी 1 लाख रूपये घेतले आणि आणखी सुविधा हव्या असतिल तर प्रत्येक महिन्याला 1 लाख रूपयाची मागणीही केल्याचा आरोप त्याच्या वकिलाने केलाय. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या जेलमध्ये केक,चाकू,मेणबत्ती,लायटर आलंच कसं असा सवाल विचारला जातोय.

First published: July 29, 2018, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading