दावोसमध्ये इम्रान खान आणि ट्रम्प यांची भेट, काश्मीरवर भारत-पाकिस्तानची मदत करण्यासाठी तयार

दावोसमध्ये इम्रान खान आणि ट्रम्प यांची भेट, काश्मीरवर भारत-पाकिस्तानची मदत करण्यासाठी तयार

अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी परस्पर हित, प्रादेशिक सुरक्षा, काश्मीर आणि अफगाणिस्तान शांतता प्रक्रिया यावरही भाष्य केले.

  • Share this:

दावोस(इस्लामाबाद), 22 जानेवारी :  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मंगळवारी स्वित्झर्लंडच्या दावोस येथे भेट झाली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या वतीने दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी बोलताना पुन्हा एकदा ट्रम्प यांनी काश्मीरला मदत करण्याविषयी बोललं आहे.  डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात काश्मीरबद्दल विचार करीत आहोत आणि जर आम्ही मदत करू शकलो तर नक्कीच करू.

डब्लूईएफच्या झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांनी अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांना वाढवण्यासाठी सहमती दाखवली आहे. अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी परस्पर हित, प्रादेशिक सुरक्षा, काश्मीर आणि अफगाणिस्तान शांतता प्रक्रिया यावरही भाष्य केले. या बैठकीत इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तान सुरुवातीपासूनच आपल्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करणारा देश आहे. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात आपली महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी ते नेहमीच तयार असतील.

बैठकीमध्ये राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले की, इम्रान खान त्यांचे चांगले मित्र आहेत. दोन्ही नेत्यांनी या बैठकीआधीच ट्रम्प यांनी सांगितले होते की काश्मीर मुद्दा आणि अफगान शांती यावर या बैठकीमध्ये व्यापक चर्चा होणार आहे. दावोसच्या या सम्मेलनात अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांच्या बैठकीवर संपूर्ण जगाचे लक्ष होते.

इतर बातम्या - मुंबईत आणखी एक 'नीरव मोदी' घोटाळा, 4 हजार कोटींना लावला बँकांना चुना

काश्मीर मतदीवर आधीही बोलले होते ट्रम्प

राष्ट्रपती ट्रम्प हे काश्मीर मुद्द्यावर बोलण्याची पहिली वेळ नाही आहे. याआधी अनेकदा त्यांनी या मुद्द्यावर त्यांचे विचार मांडले आहेत. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये ट्रम्प म्हणाले होते की, जर भारताची इच्छा असेल तर अमेरिका काश्मीर मुद्द्यावर मध्यस्ती करण्यासाठी तयार आहे. पण नंतर ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांनी हे प्रकरण द्विपक्षीयपणे सोडवावे. या विषयावर बरीच चर्चा झाली आणि भारताने त्याला तीव्र विरोध दर्शविला. भारत सुरुवातीपासूनच असे म्हणत आला आहे की, काश्मीर हा मुद्दा पाकिस्तानशी द्विपक्षीय आहे आणि त्यावरून तिसर्‍या देशाचा हस्तक्षेप त्याला आवडत नाही.

इतर बातम्या - OMG! लग्नानंतर अवघ्या वर्षभरात ही प्रसिद्ध अभिनेत्री घेतेय घटस्फोट

पाकिस्तानाच्या कुरापती सुरुच

एकाबाजुला भारत काश्मीरला दहशतवादी मुद्दा म्हणतो तर दुसरीकडे पाकिस्तान या मुद्द्यावर जगातील प्रत्येक ठिकाणी मांडत असतो. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली होती आणि काश्मीरविषयी रडगाणे गायले होते. यावेळी ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यांवर शांतीपूर्ण समाधानासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले पाहिजे यावर इम्रान खानने जोर दिला होता. यावेळी ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्ती करण्याच्या निर्णयावर इम्रान यांनी त्यांचे कौतूक केले होते. त्याचबरोबर इम्रान खान यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीबद्दल माहिती दिली.

First published: January 22, 2020, 7:08 AM IST

ताज्या बातम्या