19 व्या वर्षी जिंकली US OPEN, ग्लॅमरस PHOTO पाहून तुम्हीही व्हाल फिदा!

दिग्गज टेनिसस्टार सेरेना विल्यम्सला पराभूत करून कॅनडाच्या बियांकानं अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकली.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 03:46 PM IST

19 व्या वर्षी जिंकली US OPEN, ग्लॅमरस PHOTO पाहून तुम्हीही व्हाल फिदा!

कॅनडाच्या 19 वर्षीय बियांका अँड्रेस्क्यूनं अमेरिकन खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं. या तिनं 23 वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सला पराभूत करून इतिहास रचला.

बियांका ग्रँडस्लॅम जिंकणारी कॅनडाची पहिली खेळाडू ठरली आहे. सेरेनाला सरळ सेटमध्ये 6-3, 7-5 ने पराभूत केलं. सर्वात कमी वयात ग्रँडस्लॅम जिंकणारी बियांका दुसरी विजेती ठरली आहे.

याआधी 2006 मध्ये मारिया शारापोव्हानं हा विक्रम केला आहे. बियांका गेल्या वर्षी क्रमवारीत पहिल्या 200 मध्येही स्थान मिळवू शकली नव्हती. तर आता ती 15 व्या स्थानी पोहोचली आहे.

गेल्या वर्षी बियांकाला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी पात्रही ठरली नव्हती. दोन वर्षांपासून ती यासाठी प्रयत्न करत होती. 2019 च्या सुरुवातीला बियांकानं बीएनपी परिबास स्पर्धा जिंकली होती.

एका दुखापतीमुळं संपूर्ण हंगाम ती बाहेर राहिली होती. त्यानंतर बियांकानं जबरदस्त पुनरागमन करत अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकली.

Loading...

सेरेना विल्यम्सनं पहिल्यांदा अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती तेव्हा बियांकाचा जन्मही झाला नव्हता. सेरेनाने आतापर्यंत 6 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तर बियांकानं पहिल्यांदाच पात्र ठरल्यानंतर थेट तिनं विजेतेपदाला गवसणी घातली.

बियांकाचे आई-वडील रोमानियात राहणारे आहेत. दोघेही कॅनडाला स्थलांतरीत झाले. त्यानंतर तिथलंच नागरिकत्व घेतलं आहे. बियांकाचा जन्म कॅनडात झाला आहे.

अमेरिकन खुल्या स्पर्धेत सेरेनाला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जास्त होती. सेरेनानं एक गुण पटकावला तरी जल्लोष केला जात होता. एकवेळ बियांकानं कानावर हात ठेवले हेत. सामना जिंकल्यानंतर तिनं सेरेनाच्या पराभवाबद्दल प्रेक्षकांची माफी मागितली.

ती म्हणाली की, मी वाईट वाटत आहे. मला माहिती आहे तुम्हाला सेरेनाला जिंकताना बघायचं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...