Home /News /news /

'भारताची हवा घाणेरडी', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नरेंद्र मोदी ट्रोल

'भारताची हवा घाणेरडी', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नरेंद्र मोदी ट्रोल

ट्रम्प यांनी चीन, भारत आणि रशियावर वायू प्रदूषणाशी निगडीत योग्य पाऊले न उचलल्याचा आरोप केला आहे.

    वॉशिंग्टन, 23 ऑक्टोबर : अमेरिकेत निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन यांच्यात शाब्दीक चकमकही वाढल्या आहेत. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. ट्रम्प यांनी चीन, भारत आणि रशियावर वायू प्रदूषणाशी निगडीत योग्य पाऊले न उचलल्याचा आरोप केला आहे. अध्यक्षीय चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची हवा अस्वच्छ असल्याचे वर्णन ट्रम्प यांनी केले. तसेच, पॅरिस हवामान करारापासून मागे हटण्याचा अमेरिकेचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. नॅशविल येथील बेलमोंट विद्यापीठात झालेल्या शेवटच्या अध्यक्षीय चर्चेदरम्यान ट्रम्प म्हणाले की, "चीनकडे पाहा, ते किती घाणेरडे आहे. रशियाकडे पहा, भारताकडे पाहा, ते खूप घाणेरडे आहेत. इथली हवा खूप घाणेरडी आहे". 3 नोव्हेंबरला अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भारतीयांनी टीका करण्यात सुरुवात केली आहे. तर, विरोधकांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना निशाणा करत जाब विचारला. वाचा-US Elections अमेरिकेत या वेळी सोपं नाही मतदान करणं; जाणून घ्या कारणं खरं तर अमेरिकेत झालेल्या अंतिम चर्चेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खराब वातावरणाबद्दल भारतविरूद्ध वक्तव्य करताच 'Filthy' चा ट्रेंड सुरू केला. ट्रम्प यांच्या भारताच्या हवेविषयीच्या विधानावर कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, हॉडी मोदींचा निकाल आता समोर येत आहे. त्यांनी ट्विट केले, ट्रम्प यांनी सर्वप्रथम भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित केले, आता ट्रम्प म्हणाले की भारताची हवा घाणेरडी आहे. ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग म्हटले. हा 'हॉडी मोदीचा' चा निकाल आहे. वाचा-एकही कोरोना रुग्ण नसल्याचा दावा करणाऱ्या उत्तर कोरियावर नवं संकट, किम घाबरले दुसरीकडे, शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले आहे की, ट्रम्प यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. हवामान बदलाविरूद्धच्या लढाईत भारताच्या प्रयत्नांची आठवणही प्रियंका यांनी यावेळी करून दिली. तर, कॉंग्रेसचे कार्यकर्ते श्रीवत्सा यांनी ट्विट केले की, 'अहमदाबादमधील नमस्ते ट्रम्पसाठी मोदींनी 3.7 कोटी खर्च केले. आता हेच मोदींची हवा घाणेरडी असल्याचे म्हणत आहे, याला मोदी उत्तर देतील?' वाचा-मोठी बातमी! भारत- अमेरिकेची 26 तारखेला दिल्लीत मोठी बैठक अमेरिकेत या वेळी सोपं नाही मतदान करणं सामान्यपणे कुठल्याही देशातील निवडणुकीत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कष्ट करावे लागतात. मतदान केंद्रांपर्यंत पोहोचणं आणि तिथं रांगांत उभं राहणं या गोष्टी अमेरिकेतील नागरिकांनाही कराव्या लागतात. या वेळी कोरोनामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली आहे. लॉकडाउनमुळे या निवडणुकीत मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कमतरता जाणावणार आहे. ही संखा कमी झाल्यामुळे निवडणूक नियोजन करणाऱ्यासोबतच मतदारांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. काही राज्यांत निवडणुकीसाठी सध्या घातलेल्या निर्बंधांमध्ये सूट देण्याचं सरकारनी जाहीर केलं आहे तरीही मतदान करणं नागरिकांना अवघड जाणार आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Donald Trump, Narendra modi

    पुढील बातम्या