News18 Lokmat

डॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार?

डॉलरच्या तुलनेत होणारी रूपयाची घसरण बंद झालीय. गेली दोन दिवस रूपयाची किंमत वाढली असून डॉलरला हादरा बसलाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2018 09:45 PM IST

डॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार?

नवी दिल्ली, ता.15 नोव्हेंबर : डॉलरच्या तुलनेत होणारी रूपयाची घसरण बंद झालीय. गेली दोन दिवस रूपयाची किंमत वाढली असून डॉलरला हादरा बसलाय. गुरूवारी एका डॉलरची किंमत 72 रूपयांपेक्षाही खाली आली. रूपया 33 टक्क्यांनी मजबूत झाला. रूपयाची किंमत 71.98 वर स्थिर झाली. बुधवारीही रूपया 36 पैशांनी मजबूत झाला होता.


डॉलर का घसरतोय?


आंतरराष्ट्रीय व्यापारातला चढउतार, कच्च्या तेलांच्या किंमतीत झालेली घट, बड्या देशांमधलं ट्रेड वॉर यामुळं डॉलर घसरतोय. अमरिका आणि चीनमध्येही व्यापरयुद्ध सुरू असल्याने त्याचाही परिणाम डॉलरवर झालाय. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यानं त्याचा मोठा परिणाम डॉलरवर झालाय.

Loading...


रूपया मजबुत झाल्यानं काय होणार?


रूपयाची किंमत ही मागणी आणि पुरवढ्यावर अवलंबून असते. डॉलर घसरल्याने आयत करणं स्वस्त होईल. डॉलर हे जगभर मान्य असलेलं चलन आहे. जगभरातला बहुतांश व्यापार हा डॉलरमध्येच होत असतो. त्यामुळं इतर देशांशी व्यापार करताना भारताला कमी पैसे द्यावे लागतील.


सामान्यांवर काय परिणाम होणार?


पेट्रोल आणि डिझेलचा व्यापार हा डॉलरमध्येच होत असतो. भारत प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे तेलाच्या आयातीवर खर्च करतो. डॉलर घसरल्याने तेलाच्या किंमती कमी होतील. आपल्याला कमी पैसे द्यावे लागतील. जगभर पर्यटनासाठी गेलेल्या लोकांना फायदा होईल. शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या विद्यार्थ्यांनाही फायदा होईल. डॉलरचा भाव 1 रूपयाने वाढला तर तेल कंपन्यांवर 8 हजार कोटींचा बोजा पडतो. महागाईही वाढते. आता तेला डॉलरच घसरल्याने सर्वच गोष्टींचा फायदा होईल.


तोट्याचं काय आहे?


डॉलर घसरल्याने इतर मोठे फायदे असले तरी एका गोष्टीमध्ये मात्र फटका बसणार आहे. डॉलरची किंमत कमी झाली तर भारताच्या परकीय गंगाजळीला त्याचा फटका बसेल. त्याचं मुल्य कमी होईल. डॉलर जर मजबूत झाला तर परकीय गंगाजळीचं मुल्य वाढतं.

VIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 09:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...