गांधींना मारणारा हिंदूच होता, CAA विरोधी महासभेत उर्मिला मातोंडकरांचं वक्तव्य

गांधींना मारणारा हिंदूच होता, CAA विरोधी महासभेत उर्मिला मातोंडकरांचं वक्तव्य

केंद्र सरकारनं केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा काळा कायदा आहे. तो केवळ मुस्लिमविरोधीच नाही तर तो गरीब विरोधीही असल्याची टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली.

  • Share this:

पुणे, 30 जानेवारी: 'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा कुणी मुस्लीम, शीख, इसाई नव्हता तर तो हिंदूच होता. त्यामुळे देशाला मुस्लिमांकडून धोका आहे, असं भासवणाऱ्यांपासून सावध राहा,' असं वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पुण्यातील गांधी भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

'केंद्र सरकारनं केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा काळा कायदा आहे. तो केवळ मुस्लिमविरोधीच नाही तर तो गरीब विरोधीही आहे,ट अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली. देशात सध्या सगळ्या गोष्टी हिंदू मुस्लिम या पातळीवर आणून ठेवल्या जात आहेत. पण संविधानात जात, धर्म, लिंगावरून भेदभाव केला जात नाही, अशा गोष्टींना संविंधानात थारा नाही असं सांगत उर्मिला यांनी सीएए रद्द करण्याची मागणी केली.पुण्यातील गांधीभवनमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधी अहिंसात्मक जनआंदोलन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी सीएएवरून केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली.

दुसरीकडे, पुण्यातच झालेल्या नारिकत्व सुधारणा कायदा विरोधी महासभेत जिग्नेश मेवाणी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल मुक्ताफळं उधळली. सावरकर हे ब्रिटिश सरकारधार्जिणे आणि माफीवीर होते, असं वादग्रस्त वक्तव्य जिग्नेश मेवाणींनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.

दिल्लीतल्या शाहीनबागमध्ये झालेल्या गोळीबारावरूनही जिग्नेश मेवाणी यांनी सरकारला धारेवर धरलं. गांधी पुण्यतिथीच्या दिवशीच दिल्लीत आणखी एक गोडसे तयार होतोय, अशी खरमरीत टीका जिग्नेश मेवांनींनी केली.

First published: January 30, 2020, 10:05 PM IST

ताज्या बातम्या