‘माझ्याकडे अभिनेत्री म्हणून नाही तर काँग्रेस कार्यकर्ता म्हणून पाहा’

‘माझ्याकडे अभिनेत्री म्हणून नाही तर काँग्रेस कार्यकर्ता म्हणून पाहा’

मी मराठी आहे. त्यामुळे मनसेपासून प्रत्येक मराठी माणसाकडे समर्थन मागणं माझा अधिकार आहे.

  • Share this:

मुंबई, ०२ एप्रिल- बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली. यावेळी उर्मिलाने खास न्यूज १८ इंडियाशी संवाद साधला. यावेळी उर्मिला म्हणाली की, ‘सध्याच्या सरकारविरुद्ध सगळीकडेच नाराजी आहे. मराठी पक्षाचे लोक मला समर्थन देत आहेत. माझं कॅम्पेनिंग उत्तम सुरू आहे.’

उर्मिला पुढे म्हणाली की, ‘मी लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न ऐकत आहे. माझी तुलना इंदिरा गांधी यांच्यासोबत केली जाते ते चुकीचं आहे. इंदिरा गांधी माझ्या आदर्श आहेत. कोणासारखे कपडे घातल्यामुळे तुम्ही त्या व्यक्तिसारखे होत नाहीत. पण माझ्या स्वप्नातही जर मी त्यांच्यासारखी झाले तर मी स्वतःला नशीबवान समजेन.’

उर्मिला म्हणाली की, क्रिकेटर आणि कलाकारांवर लोक अतोनात प्रेम करतात. पण ते मुर्ख नाहीयेत की त्यांच्या हात हलवण्यावर आणि हसण्यावर मत देतील. मला लोकांनी एक अभिनेत्री म्हणून मत देऊ नये. मी पक्षात एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे.

‘मी मराठी आहे. त्यामुळे मनसेपासून प्रत्येक मराठी माणसाकडे समर्थन मागणं माझा अधिकार आहे. लोक माझ्यावर विश्वास ठेवत आहेत. मुंबईत अनेकांकडे घरं नाहीयेत. महिलांसाठी सरकारी डॉक्टर नाहीयेत. मी हे सर्व मुद्दे घेऊन पुढे जाईन आणि त्यावर काम करेन.’

दरम्यान, उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालेल्या उर्मिला मातोंडकर रविवारी (31 मार्च) गोराईतील रिक्षा चालकांसोबत दिसल्या. गोराई येथील काँग्रेस ऑफिस जाण्याआधी त्यांनी येथील रिक्षा चालकांची भेट घेतली. या भेटी दरम्यानचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले.

उर्मिला मातोंडकर यांच्या आधी 2004मध्ये याच जागेवर अभिनेता गोविंदानं लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यानं भाजप नेता राम नाईक यांना हरवलं होतं. मात्र त्यानंतर 2009ची निवडणूक गोविंदानं लढवली नाही. त्यामुळे ही जागा संजय निरुपम यांना मिळाली. पण आता या जागेची जबाबदारी उर्मिला मातोंडकर यांच्यावर आहे. त्यामुळे आता राजकारणात जनतेची मनं जिंकण्यात रंगीला गर्ल उर्मिला कितपत यशस्वी ठरते हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.

उद्धव ठाकरे पालघरच्या दौऱ्यावर, प्रचारापूर्वी गुरूद्वारामध्ये टेकला माथा

First published: April 2, 2019, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading