मुंबई, २० फेेब्रुवारी २०१९- जम्मू- काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आलं. या भ्याड हल्ल्यानंतर देशभरातून राग व्यक्त केला जात होता. या हल्ल्यानंतर अचानक चित्रपटगृहांमध्ये 'उरी' सिनेमाच्या तिकीट विक्रीमध्ये वाढ झाली. Paytm आणि Bookmyshow.com च्या मते, या सिनेमाचे स्क्रिनिंग कमी करण्यात आले होते. पण आता सिनेमाच्या वाढत्या मागणीमुळे स्क्रिनिंग पुन्हा वाढवण्यात आल्या आहेत.
जम्मू- काश्मीर येथील उरी परिसरात भारतीय सेनेच्या कँम्पवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पलटवार करत सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. भारतीय सेनेने पाकिस्तान सीमा रेषेतील दहशतवाद्यांच्या बेस कँम्पवर सर्जिकल स्ट्राइक केलं याची चित्तथरारक कथा उरी सिनेमात मांडण्यात आली आहे. ११ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
पुलवामा हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची मागणी वाढत आहे आणि लोक पुन्हा या सिनेमाचं तिकीट विकत घेऊन सिनेमा पाहत आहेत. Paytm कडून या सिनेमाला पुन्हा एकदा प्रमोट केलं जात आहे. तसेच चित्रपटगृहात या सिनेमाला नवीन शो स्लॉट देण्यात आले असून गली बॉयचे काही शो कमी करण्यात आले आहेत.
PVR Cinemas चे मुंबईचे मॅनेजरांच्या मते, सर्वसामान्यपणे जुन्या सिनेमाला संध्याकाळी ३ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत कोणताही स्लॉट मिळत नाही. पण 'उरी' सिनेमाच्या वाढत्या मागणीमुळे हा सिनेमा पुव्हा एकदा प्राइम स्लॉटवर आला आहे. या शुक्रवारी 'टोटल धमाल' सिनेमा प्रदर्शित होत आहे.
'उरी' सध्या चांगलं कलेक्शन करत आहे त्याचा फटका 'गली बॉय'च्या शोवर बसू शकतो. याचा फटका जेवढा 'गली बॉय'ला बसला त्याहून जास्त 'ठाकरे' आणि 'मणिकर्णिका' सिनेमांना बसला आहे. या सिनेमांच्या वेळाही 'उरी' सिनेमाला देण्यात आले आहेत. 'ठाकरे' सिनेमा मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनवरून जवळपास गायबच झाला आहे.
SPECIAL REPORT : 'शरण या, अन्यथा मरणाला तयार राहा'