गुरुग्राम(हरियाणा), 14 जुलै : असं म्हणतात की, एखादी गोष्ट मनात आणली आणि जिद्दीने त्यासाठी प्रयत्न केले तर ती मिळवण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. याचच एक उत्तम उदाहरण गुरुग्राममध्ये समोर आलं आहे. गुरुग्नाममध्ये राहणाऱ्या निधी सिवाचने मोठ्या जिद्दीने आपली स्वप्न साकारत आताच्या पीढीसमोर मोठा आदर्श ठेवला आहे.
निधीने 2018 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेत 83व्या क्रमांकावर यश मिळवलं. परंतु तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. 'जर कोणत्याही परीक्षेमध्ये तू नापास झाली तर तुझं लग्न लावून देऊ' अशी अट निधीच्या वडिलांनी मांडली होती. पण निधी वडिलांच्या अटीपुढे हारली नाही तर तिने स्वत:ची स्वप्न पूर्ण केली.
मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, निधीने वर्ष 2015 मध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगमधून पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने हैद्राबादमधून टेक महिंद्रामध्ये नोकरी केली होती. तिथे निधी एका चांगल्या पदावर काम करत होती. त्यानंतर निधीने सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करण्यास सुरुवात केली.
निधीने सिव्हिल सर्व्हिसेसच्या अभ्यासाठी टेक महिंद्रामधली नोकरी सोडली आणि हैद्राबादला घरी गेली. त्यानंतर निधीने स्वत:च्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिलं. नोकरी करत असतानादेखील ती सतत काहीतरी वाचत असायची. पण नोकरी सोडून तिने सिव्हिल सर्व्हिसेसच्या अभ्यासाठी पूर्ण वेळ देण्याचं ठरवलं.
कोणत्याही क्लासेसशिवाय केला अभ्यास...
सिव्हिल सर्व्हिसेसच्या अभ्यासासाठी निधीने कोणतेही क्लासेस लावले नाही. तिने सगळा अभ्यास घरीच केला. अभ्यास करण्यासाठी क्लासेस नाही तर तुमचे प्रयत्न महत्त्वाचं असल्याचं निधी म्हणते. तिच्या या जिद्दीचं आणि अभ्यासू वृत्तीचं घरी सगळ्यांना कौतुक होतं.
वडिलांनी शिक्षणासाठी ठेवली अट...
निधी जेव्हा अभ्यासाच्या तयारीत होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्यासमोर एक अट ठेवली होती. जर ती कोणत्याही परीक्षेत नापास झाली तर तिचं लग्न लावून दिलं जाईल. पण, वडिलांच्या या अटीमुळे ती डगमगली नाही तर तिने मोठ्या धैर्याने अभ्यास केला आणि उत्तीर्ण झाली.
सहा महिने घराचा दरवाजा नाही पाहिला...
वडिलांच्या सर्व अटी मान्य करत निधी अभ्यासात लक्ष देत होती. परीक्षेची संपूर्ण तयारी पूर्ण होत नाही तोपर्यंत घराचा दरवाजा पाहणार नाही असं निधीने ठरवलं होतं. त्यामुळे तिने स्वत:ला घरात बंद ठेवून अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिलं.
परीक्षेवेळी उत्तरपत्रिका पुर्ण भिजली होती...
परीक्षेचा अनुभव सांगताना निधी म्हणाली की, मी निबंध लिहिण्यास सुरू केला. एक पान लिहून झालं आणि तोच माझ्या मागे बसणाऱ्या एकाने चुकून माझ्या उत्तरपत्रिकेवर पाणी उडवलं. त्यामुळे माझी पूर्ण उत्तरपत्रिका भिजली. यामध्ये माझे 20-25 मिनिटं वाया गेले. पण म्हणतात ना 'देव पण परीक्षा घेतो' आज त्याचे परिणाम तुमच्या समोर आहेत.
आत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...