S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

UPSC Result 2016 : यूपीएससीच्या निकालात मुलींची बाजी, देशात नंदिनी के.आर.पहिली

युपीएससीचा निकाल जाहीर, राज्यात विश्वांजली गायकवाड पहिली

Sachin Salve | Updated On: May 31, 2017 10:43 PM IST

UPSC Result 2016 : यूपीएससीच्या निकालात मुलींची बाजी, देशात नंदिनी के.आर.पहिली

31 मे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. या निकालात मुलींना बाजी मारलीये. विश्वांजली गायकवाड ही राज्यात पहिली तर देशात अकरावी आली आहे. तर  कर्नाटकची के. आर. नंदिनी देशात पहिली आली आहे. तर  अनमोल शेरसिंग बेदी देशात दुसरा आला. गोपालकृष्ण रोनांकी हा देशात तिसरा आलाय. विशेष म्हणजे पहिल्या दहा टॉपर्समध्ये तीन मुलींचा समावेश आहे.

यूपीएससीकडून आज बुधवारी 2016 च्या परीक्षेचा निकाल जाहीर केलाय. या निकालानुसार 1099 उमेदवारांची नावं शासकीय सेवेसाठी पाठवण्यात आलीये. तर 220 उमेदवारांची नाव ही वेटिंग लिस्टमध्ये आहे.

टाॅप 10 मध्ये तीन मुलींचा समावेश आहे. के.आर.नंदिती हिच्या व्यतिरिक्त सौम्या पांडे आणि श्वेता चौहान यांचा टाॅप 10मध्ये सहभाग आहे. खुल्ल्या गटात 500, ओबीसी गटातून 347, एससी गटातून 163 आणि एसटी गटातून 89 उमेदवारांची निवड झालीये.


यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार हे भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा अ आणि ब साठी निवडले जातात.

सलग तिसऱ्या वर्षी महिला उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेत टाॅप केलंय. नंदिनीच्या आधी  टीना डाबी 2015 मध्ये तर इरा सिंघल 2014 च्या परीक्षेत पहिल्या आल्या होत्या. 2014 च्या परीक्षेत तर टाॅप 3 मध्ये मुलीच होत्या.

यूपीएससीचा निकाल पाहा इथं upsc.gov.in

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 08:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close