पनामा प्रकरण भोवलं,नवाझ शरीफ पंतप्रधानपदावरुन पायउतार

पनामा प्रकरण भोवलं,नवाझ शरीफ पंतप्रधानपदावरुन पायउतार

पनामा पेपर लीक प्रकरणात दोषी आढळल्यामुळे पंतप्रधानपदासाठी नवाझ शरीफ अयोग्य असल्याचा निर्णय पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलाय

  • Share this:

28 जुलै : पाकिस्तानात मोठा राजकीय भूकंप झालाय. पनामा पेपर लीक प्रकरणात दोषी आढळल्यामुळे पंतप्रधानपदासाठी नवाझ शरीफ अयोग्य असल्याचा निर्णय पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे नवाझ शरीफ यांना पायउतार व्हावं लागलंय.

पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना दोषी ठरवलंय. त्यामुळे नवाज यांना तात्काळ पायउतार होण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. शरीफ यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय. तसंच  नवाझ शरीफ यांच्यासोबत अर्थमंत्री इशाक डार यांनाही कोर्टाने अयोग्य ठरवलंय. कोर्टाने शरीफ यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहे. तसंच कोर्टाने एनएबीला सहा आठवड्यात पूर्ण तपास करण्याचे आदेशही दिले आहे.

पाकिस्तानातील राजकीय समीकरणं बदलल्याचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने देशाची सूत्र पुन्हा लष्काराच्या हातात जाण्याची भीती आहे. तसं झालं तर भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

पनामा प्रकरण काय आहे?

- पनामातील लॉ फर्म मोसॅक फोन्सेकानं तब्बल 1 कोटी 15 लाख गुप्त कागदपत्रं प्रसिद्ध केली

- जगातल्या श्रीमंत आणि प्रभावशाली नेत्यांची आर्थिक व्यवहारांची यात माहिती होती

- पनामा गेटमध्ये नवाझ शरीफ यांची मुलगी मरयम आणि हसन आणि हुसेन या मुलांची नावं

- शरीफ कुटुंबीयांनी परदेशी कंपन्यांमार्फत लंडनमध्ये अनेक मालमत्ता खरेदी केल्याची माहिती

- या मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पैशांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित

- मालमत्ता कायदेशीरपणेच खरेदी केल्याचा शरीफ कुटुंबीयांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 05:16 PM IST

ताज्या बातम्या