मुंबईला उद्या दूधपुरवठा नाही? पाहा आंदोलनाचे सर्व अपडेट्स

मुंबईला उद्या दूधपुरवठा नाही? पाहा आंदोलनाचे सर्व अपडेट्स

सोमवारपासून मुंबईत दूध पोहचू न देण्याचा इशारा, प्रति लिटर 5 रूपये दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • Share this:

मुंबई,ता. 15 जुलै : सोमवारपासून मुंबईत दूध पोहचू न देण्याचा इशारा, प्रति लिटर 5 रूपये दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय. आंदोलन न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. तर मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. रविवारी पंढरीच्या विठ्ठलाला दुधाचा अभिषेक करून आंदोलनाला सुरुवात करणार. दुधाला लीटर मागे 5 रुपये भाव ही आमची मागणी आहे. 3 रुपये दरवाढ हा निर्णय दूध पावडर तयार करणाऱ्यांनी केलाय. फक्त दूध संकलन करणाऱ्यांचा हा निर्णय आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा प्रश्न नाही असंही ते म्हणाले.

राज्यात काय चाललंय?

  • अहमदनगर जिल्ह्यातील सर्व दूध संघाने रविवारी सायंकाळपासून पासून दूध संकलन बंद केलं. प्रभात , एस आर थोरात , राजहंस , कृष्णाई , पंचमहल इत्यादी सर्वांनी दूध न पाठविण्याचा निर्णय घेत आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

  • उस्मानाबाद मदर डेअरीचा चा टँकर आंदोलकांनी अडवला. या टँकरमध्ये साडे बारा हजार लिटर दुध आहे.

  • सांगली जिल्ह्यात दूध आंदोलनाला, मिरज पूर्व भागातील 100 दूध डेयरी मालक, दूध संकलन केंद्र मालक, गवळी, यांनी पाठिंबा दिलाय. हे सर्व संघ दूध संकलन बंद ठेवणार.

  • शिर्डी-अहमदनगर - अनेक दूध संघ आणि डेअरींचा दूध संकलन न करण्याचा निर्णय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिर्डीत मध्यरात्री साई मूर्तीला दुधाचा अभिषेक करून करणार आंदोलनाची सुरूवात.

  • अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे शेतकरी संघटनेच्यावतीने दुधाचा टँकर पेटवून आंदोलन केलं.

  • कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलीसांनी धरपकड सुरू केलीय. सरकारकडून दूध आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. कोल्हापूर पोलिसांनी आतपर्यंत 25 हुन अधिक कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात.

 

First published: July 15, 2018, 7:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading