सिने नाट्य कलाकार दिनेश साळवी यांचं आकस्मिक निधन

सिने नाट्य कलाकार दिनेश साळवी यांचं आकस्मिक निधन

प्रसिद्ध सिने नाट्य कलाकार दिनेश साळवी यांचं विलेपार्ले इथे स्टेशनवरून चालताना अचानक अॅटॅक येऊन आकस्मिक निधन झालं. ते 53 वर्षांचे होते.

  • Share this:

मुंबई, 31 जानेवारी : प्रसिद्ध सिने नाट्य कलाकार दिनेश साळवी यांचं विलेपार्ले इथे स्टेशनवरून चालताना अचानक अॅटॅक येऊन  आकस्मिक निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. पार्ल्याच्या स्टेशनवरून जाताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. ते खाली बसले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. या झालेल्या दु:खद घटनेमुळे सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

साळवींनी सीआयडी मालिकेत काम केलं होतं. अनेक मालिकांमध्ये ते छोट्या भूमिका करायचे. काॅलेजमध्ये एकांकिका बसवण्याचं काम त्यांना आवडायचं. म्हणून काॅलेज तरुण-तरुणींत ते लोकप्रिय होते. कामगार कल्याणची अनेक नाटकं त्यांनी बसवली होती आणि त्यात भूमिकाही साकारल्या होत्या.

त्यांच्या निधनानं सिनेमा, नाट्य आणि मालिका इथल्या कलाकारांना धक्का बसलाय.

First published: January 31, 2019, 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading