News18 Lokmat

आगामी विधानसभा निवडणुकीत मिसेस मुख्यमंत्री नागपुरात करणार प्रचार

आगामी विधानसभा निवडणुकीत नागपुरमधील देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात प्रचार करणार असल्याचे मिसेस मुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी सांगितले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 08:38 PM IST

आगामी विधानसभा निवडणुकीत मिसेस मुख्यमंत्री नागपुरात करणार प्रचार

हर्षल महाजन, (प्रतिनिधी)

नागपूर, 6 जुलै- आगामी विधानसभा निवडणुकीत नागपुरमधील देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात प्रचार करणार असल्याचे मिसेस मुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील मतदार संघासोबतच गरज पडेल तिथे प्रचार करण्याचा प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील फेटरीतील पाणीपुरवठा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पाचे उद्धाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी दत्तक घेतेलेल्या फेटरी या गावातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी अमृता फडणवीस आल्या होत्या. कळमेश्वर तालुक्यातील फेटरी हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी फेटरी गाव दत्तक घेतल्यापासून अनके कामांची सुरूवात फेटरीत करण्यात आली आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी येत असतात.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, फरक पडत नाही!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, काही फरक पडत नाही! ते माणूस म्हणून कसे आहेत ते महत्वाचं आहे. देवेंद्र हे कायम माझ्यासोबत भक्कमपणे उभे असतात, असे मि.मुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पत्नी असण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. टीकेचे जे दगड माझ्यावर मारले जातात. त्यातील constructive (रचनात्मक) दगड महत्त्वाचे जे desteuctive(नकारात्मक) त्याकडे लक्ष न दिलेले बरे असे अमृता फडणवीस यांनी परखडपणे सांगितले.

Loading...

अमृता फडणवीस पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. निमित्त होतं उषा संजय काकडे यांच्या संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात एका कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमात गौरी शाहरूख खानही सहभागी झाल्या होत्या. गाणं, संगीत ही पॅशन असलेल्या अमृताला मुलाखतकार आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने 4 ओळी गुणगुणायला सांगितलं. तेव्हा अमृता यांनी 'हर पल यहा जी भर जियो कल हो ना हो,' हे गाणं गुणगुणलं.

फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन'चा निर्धार, Mrs मुख्यमंत्री म्हणाल्या 'कल हो ना हो'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2019 08:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...