• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • उत्तरप्रदेशात 15 ऑगस्टला मदरशात राष्ट्रगीत आणि तिरंग्याची सक्ती !

उत्तरप्रदेशात 15 ऑगस्टला मदरशात राष्ट्रगीत आणि तिरंग्याची सक्ती !

येत्या 15 ऑगस्टला उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकावणे आणि राष्ट्रगीत गाणं सक्तीचं करण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर त्याचं व्हिडिओ शुटिंग करून ते राज्य सरकारला सादरही करावं लागणार आहे. उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण परिषदेने यासंबंधीचे निर्देश जारी केले आहेत.

  • Share this:
लखनौ. 1ऑगस्ट : येत्या 15 ऑगस्टला उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकावणे आणि राष्ट्रगीत गाणं सक्तीचं करण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर त्याचं व्हिडिओ शुटिंग करून ते राज्य सरकारला सादरही करावं लागणार आहे. उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण परिषदेने यासंबंधीचे निर्देश जारी केले आहेत. गेल्या विधानसभेत उत्तरप्रदेशात योगी सरकार आल्यापासून अल्पसंख्यांक समाज तसाही अस्वस्थ असल्याचा आरोप होतोय. अशातच आता मदरशांमधून राष्ट्रगीत गाण्याचं अनिवार्य करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मदरसा संघटनांनी मात्र, या आदेशाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केलीय. सरकार आमची राष्ट्रभक्ती आता राष्ट्रगीत गाण्यावरून ठरवणार का ? असा सवाल मुस्लीम संघटनांनी उपस्थित केलाय. मदरशांमधून आम्ही मुलांना नियमितपणे देशप्रेमाचेच धडे देत आहोत. तरिही आमच्या देशभक्तीवर अशा पद्धतीने शंका उपस्थित करणे, अतिशय चुकीचे आणि निषेधार्ह असल्याचं मुस्लीम बांधवांनी म्हटलंय.
First published: