Home /News /news /

डोक्यावर छप्पर नाही; आईने सोडलं अन् बाप तुरुंगात, 10 वर्षांच्या मुलावर श्वानासोबत झोपण्याची वेळ

डोक्यावर छप्पर नाही; आईने सोडलं अन् बाप तुरुंगात, 10 वर्षांच्या मुलावर श्वानासोबत झोपण्याची वेळ

उत्तर प्रदेशातल्या (U.P.) थंडीत फुटपाथवर (Footpath) झोपलेल्या एका दहा वर्षाच्या मुलाचा फोटो चांगलाच व्हायरल झालाय. या मुलाच्या अंगावर एक छोटी चादर आहे आणि त्याच्या कुशीत एक कुत्रा झोपलाय.

    मुजफ्फरनगर, 17 डिसेंबर : उत्तर भारतामध्ये (North India) सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. संपूर्ण शरीर गोठावून टाकणाऱ्या या थंडीपासून बचाव करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय. या थंडीत फुटपाथवर (Footpath) झोपलेल्या एका दहा वर्षाच्या मुलाचा फोटो चांगलाच व्हायरल झालाय. या मुलाच्या अंगावर एक छोटी चादर आहे आणि त्याच्या कुशीत एक कुत्रा झोपलाय. ज्या वयात आई-वडिलांकडं हट्ट करायचा, भावंडासोबत खेळायचं, मित्रासोबत शाळेत जायचं त्या वयात त्या मुलाला परिस्थितीचे चटके सहन करावे लागत आहेत. त्याला ऐन थंडीत त्याच्यावर एका दुकानाच्या समोरच्या फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे. मुलगा फुटपाथवर कसा आला? उत्तर प्रदेशातल्या (U.P.) मुजफ्फरनगरमधला (Muzaffarpur) हा फोटो आहे. कडाक्याच्या थंडीत परिस्थितीची दाहकता सहन करणाऱ्या या मुलाचं नाव आहे अंकित. अंकित इथवर कसा पोहचला याची गोष्ट ही तितकीच हेलावून टाकणारी आहे. अंकितचे वडिल सध्या जेलमध्ये आहेत. तर आई आपल्याला सोडून गेली असं अंकित सांगतो. त्याची आई नेमकी कुठं आहे? आईनं त्याला का सोडलं? आई या जगात आहे की नाही?  या आणि आशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. लहान मुलासाठी आई हे सर्वस्व असते. मुलाला काहीही त्रास झाला की पहिल्यांदा आईची आठवण येते. अडचणीत सापडलेला मुलगा काही तरी मार्ग निघेल या आशेनं आईकडं पाहतो. जगातल्या सर्व त्रासापासून मुलाचं संरक्षण करणारी त्याची आई ही त्याच्या आयुष्याची ढाल असते, त्याच आईमुळे अंकितवर अक्षरश: फुटपाथवर झोपण्याची वेळ आली. हे वाचा-तुमच्या मोबाइलमध्ये कसं येणार मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची काय आहे योजना? अंकितला मिळाली मदत अंकितचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर मुजफ्फरनगर पोलिसांनी अंकितचा शोध घेतला. त्याला थंडीचे कपडे आणि पोटभर खायला अन्न दिलं. अंकितला आता बालसुधारगृहात सोपवण्यात आलं आहे. या सुधारगृहाच्या माध्यमातूनच त्याला पुढील शिक्षण दिले जाणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Photo viral

    पुढील बातम्या