कानपूरमधल्या 'टल्ली' हेडमास्तरचा व्हिडिओ व्हायरल

कानपूरमधल्या 'टल्ली' हेडमास्तरचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या उत्तरप्रदेशातील 'टल्ली' मास्तरचा व्हिडिओ भलताच व्हायरल झालाय. हे गुरूजी महाशय चक्क दारूच्या नशेतच वर्गात पोहोचतात आणि त्याच अवस्थेत चक्क मुलांना शिकवू लागतात. शेवटी वर्गातली मुलंच न राहवून त्यांची टर उडवतात. शाळेतल्या मुलांनीच त्यांचा दारूच्या नशेतला व्हिडिओ मोबाईलवर शूट केलाय.

  • Share this:

कानपूर, 19 सप्टेंबर : सोशल मीडियावर सध्या उत्तरप्रदेशातील 'टल्ली' मास्तरचा व्हिडिओ भलताच व्हायरल झालाय. हे गुरूजी महाशय चक्क दारूच्या नशेतच वर्गात पोहोचतात आणि त्याच अवस्थेत चक्क मुलांना शिकवू लागतात. शेवटी वर्गातली मुलंच न राहवून त्यांची टर उडवतात. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातल्या परसाद गावात हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे हे महाशय याच शाळेचे हेडमास्तरही आहेत बरं...विशेष म्हणजे शाळेतल्या मुलांनीच त्यांचा दारूच्या नशेतला व्हिडिओ मोबाईलवर शूट केलाय. तर काही मुलांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढलाय.

या व्हिडिओत तुम्हीच पाहा तळीराम हेडमास्तरची मुलांनी कशी मजा घेतलीय ते....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 07:44 PM IST

ताज्या बातम्या