एकही जागा मिळाली नाही; मग काँग्रेस आनंद झालाय तरी कशाचा?

एकही जागा मिळाली नाही; मग काँग्रेस आनंद झालाय तरी कशाचा?

खराब कमगिरीनंतर देखील काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर: महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीसह देशातील अन्य राज्यात विधानसभेसाठीच्या पोटनिवडणुका (Assembly Bypolls)झाल्या. यातील उत्तर प्रदेश(UP)मधील 11 जागांचा देखील समावेश होता. पोटनिवडणुकीत 11 पैकी 8 जागांवर भाजपने तर 3 जागांवर समजावादी पक्षाने विजय मिळवला. काँग्रेसला आणि बसपा(BSP)ला एका जागेवर देखील विजय मिळवता आला नाही. पोटनिवडणुकीचा याआधीचा अनुभव असा आहे की नेहमी भाजपचा पराभव होतो आणि काँग्रेस (Congress) विजय. यावेळी मात्र काँग्रेसचा पोटनिवडणुकीत पराभव झाला. अर्थात या खराब कमगिरीनंतर देखील काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत भलेही काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नसला तरी 2017मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत पक्षाला मिळालेल्या मतांची संख्या (Vote Share) वाढली आहे. 2022मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठीचे हे चांगले संकेत असल्याचे काँग्रेसला वाटते. पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि सपा दोन्ही पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिले. पण मायावती याच्या बसपापेक्षा सोनिया गांधींच्या काँग्रेसची कामगिरी चांगली झाली. काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारील वाढली आहे. याउलट बसपाला जबलपूरची जागा राखता आली नाही आणि अन्य 6 ठिकाणी त्यांच्या मतांची टक्केवारी देखील घसरली.

काँग्रेसच्या या यशाचे श्रेय प्रियांका गांधी यांनी केलेल्या प्रयत्नांना जाते असे बोलले जात आहे. राज्यात काँग्रेसला बळकट करण्याचे काम प्रियांका करत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थावरून प्रियांका यांनी सातत्याने योगी सरकारला प्रश्न विचारत आहेत. त्याच बरोबर सरकारच्या विरोधात त्यांनी आंदोलन देखील केले आहे.

भाजपसाठी धोक्याची घंटा

2017मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Elections 2017)काँग्रेसला 6.25 टक्के मते मिळाली होती. ही टक्केवारी राज्यात आतापर्यंत काँग्रेसला मिळालेली सर्वात कमी टक्केवारी होती. पण आता पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसला पोटनिवडणुकीत 12.80 टक्के मते मिळाली. भाजपने त्यांच्या 9 पैकी 8 जागांवर विजय मिळवला असला तरी पक्षाची अवस्था फार चांगली नाही. भाजपच्या मतांची टक्केवारी 14 टक्क्यांनी कमी झाली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस समिती(UP Congress Committee)चे अध्यक्ष अजय कुमार(Ajay Kumar) यांनी पोटनिवडणुकीत मतांची टक्केवारी 2019च्या तुलनेत दुप्पट झाल्याचे म्हटले आहे.

First published: October 25, 2019, 3:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading