मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दुर्देवी! श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी दर्शनासाठी आला होता तरुण; देवाच्या दारासमोरचं सोडला जीव

दुर्देवी! श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी दर्शनासाठी आला होता तरुण; देवाच्या दारासमोरचं सोडला जीव

आज रविवार सुट्टी असल्याने तब्बल 10 जणं देवदर्शनासाठी निघाले होते.

आज रविवार सुट्टी असल्याने तब्बल 10 जणं देवदर्शनासाठी निघाले होते.

आज रविवार सुट्टी असल्याने तब्बल 10 जणं देवदर्शनासाठी निघाले होते.

  • Published by:  Meenal Gangurde

उज्जैन, 8 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) उज्जैनमध्ये रविवारी सकाळी अत्यंत धक्कादायक दुर्घटना घडली. महाकाल (Mahakal) दर्शन करण्यासाठी आलेले 3 तरुण क्षिप्रा नदीत बुडत होते. यापैकी दोघांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. मात्र 21 वर्षांच्या तरुणाचा यात बुडून मृत्यू झाला. तरुणाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असून पोलिसांनी याप्रकरणात केस दाखल केली आहे. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी देवदर्शन केलं जावं, म्हणून हे तरुण काही आप्तेंष्टांसह येथे आले होते. मात्र दुर्देवाने देवाच्या दारासमोरच त्याने जीव सोडला. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुरत शहरातून 10 जणं महाकाल दर्शनासाठी आले होते. यापैकी रवि गुप्ता, विष्णु दुबे आणि व्यास क्षिप्रा नदीवर आंघोळ करण्यासाठी पोहोचले. येथे राम घाटावर अधिक गर्दी असल्याने तिघे सिद्धा आश्रमाजवळील घाटावर आंघोळ करण्यासाठी पोहोचले. दरम्यान अचानक तिघे बुडत असल्यास दिसू लागलं. यानंतर घाटावरील दलाच्या सदस्यांनी नदीत उडी मारली. त्यांनी विष्णू आणि व्यास यांना सुखरुप बाहेर काढलं. मात्र 21 वर्षांच्या रविला वाचवू शकले नाही. (UP boy died by drowning in Kshipra came with friends to visit Mahakal temple )

हे ही वाचा-पुरात बेपत्ता झालेल्या पुनमचा 11 दिवसांनंतर मृतदेह सापडला; लेकराचा तपास सुरू

गुजरातमध्ये आले होते पर्यटक

पर्यटकांच्या टीममध्ये सर्व 10 सदस्य उत्तर प्रदेशातील निवासी आहेत. हे सर्वजण सूरत येथील कपडा फॅक्ट्रीमध्ये काम करतात. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी ते महाकाल मंदिरात दर्शनासाठी उज्जेन येथे आले होते. गेल्या रविवारी देखील उत्तर प्रदेशातील अलीगड येथील संदीप शर्मा आणि विशाल तिवारी महाकाल मंदिरात दर्शनासाठी आले होते. दोघे रामघाटवर स्नान करण्यासाठी पोहोचले. यातील संदीप याचा बुडून मृत्यू झाला होता.

First published:

Tags: Death, Madhya pradesh