'गोमूत्राने कॅन्सर बरा होतो', 'या' भाजप आमदाराने केला दावा

'कॅन्सरवर गोमूत्र हाच जालीम उपाय आहे,' असा दावा भाजप आमदाराने केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 10:10 PM IST

'गोमूत्राने कॅन्सर बरा होतो', 'या' भाजप आमदाराने केला दावा

लखनौ, 12 सप्टेंबर : भाजपच्या आणखी एका आमादाराने अजब वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. 'कॅन्सरवर गोमूत्र हाच जालीम उपाय आहे,' असा दावा उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी केला आहे.

'गोमूत्राचं सेवन केल्याने कॅन्सरसारखा आजारही बरा होता. एखाद्या निरोगी माणसानेही जर गोमूत्राचे प्यायलं तर त्याला परत कधीच कोणता रोग होत नाही. पोटाच्या विविध रोगांवरही गोमूत्र हे जालीम उपाय आहे,' असा दावा आमदार सुरेंद्र सिंह यांनी केला आहे.

प्रज्ञासिंह ठाकूरांनीही केला होता असाच दावा

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनीदेखील काही दिवसांपूर्वी गोमूत्र आणि कॅन्सरचा संबंध जोडला आहे. 'मला झालेला कॅन्सरचा आजार गोमूत्र सेवनामुळे बरा झाला,' असा दावा प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला होता.

'गोमूत्रापासून तयार करण्यात आलेली औषध घेतल्याचा मला सर्वाधिक फायदा झाला. गायीवरून फक्त हात फिरवल्याने तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं,' असा अजब दावाही प्रज्ञा ठाकूरने केला होता. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.

Loading...

शिवेंद्रराजेंचा गणपती मिरवणुकीत तुफान डान्स, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BJP
First Published: Sep 12, 2019 10:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...