आत्महत्येचा असा प्रकार तुम्ही कधी पाहिला नसेल, ट्रकच्या केबिनला लटकून संपवलं जीवन

आत्महत्येचा असा प्रकार तुम्ही कधी पाहिला नसेल, ट्रकच्या केबिनला लटकून संपवलं जीवन

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर चालकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर स्थानिकांनी चंदगड पोलिसांना याबद्दल माहिती दिली.

  • Share this:

कोल्हापूर, 08 जानेवारी: कोल्हापूरमध्ये आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रकच्या केबिनला गळफास लावून एका ट्रक चालकाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येच्या अशा प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे कारखाना स्थळावरची ही घटना आहे. परभणीतील एका ऊस ट्रक चालकाने ही आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. आर्थिक अडचण असल्यामुळे चालकाने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर चालकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर स्थानिकांनी चंदगड पोलिसांना याबद्दल माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच चंदगज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलिसांनी ट्रकची तपासणी करून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आहे.

या प्रकरणात पोलीस स्थानिकांची चौकशी करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान, या सगळ्या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे तर पोलीस या घटनेचा आता अधिक तपास करत आहेत.

Special Report : कितीही कठोर असला तरी हा VIDEO पाहिल्यावर तुमचं काळीज पाझरल्याशिवाय राहणार नाही!

First published: January 8, 2019, 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading