धक्कादायक! 3 वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाने केला बलात्कार, आरोपी ताब्यात

धक्कादायक! 3 वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाने केला बलात्कार, आरोपी ताब्यात

उन्नावच्या माखीमध्ये घराच्या बाहेर खेळणाऱ्या एका 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

कानपूर, 07 डिसेंबर : बलात्काराच्या खळबळजनक घटनांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अशात उन्नावच्या माखीमध्ये घराच्या बाहेर खेळणाऱ्या एका 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतात असणाऱ्या लोकांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांना प्रकरणाची सूचना देण्यात आली आहे. या घटनेमुळे देशात महिला वर्ग किती असुरक्षित आहे हे पुन्हा-पुन्हा समोर येत आहे. अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाने बलात्कार करण्याचा प्रयन्त केल्याने आता कायद्याचा धाकही उरला नाहीये.

या संपूर्ण प्रकरणातमध्ये प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यानंतर आरोपींवर पुढील कारवाई करण्यात येईल. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, उन्नावमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात पीडितेची मृत्यूसोबत झुंज अखेर अपयशी ठरली आहे. शुक्रवारी रात्री 11.40 वाजता सफदरजंग रुग्णालयात पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. (safdarjung hospital)सफदरजंग रुग्णालयात पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या मोठ्या बहिणीने दिली आहे.

शुक्रवारी रात्री 11.10 वाजता पीडितेचं हृदय काम करत नसल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर डॉक्टरांनी पीडितेला वाचवण्याचे अथक प्रयत्न केले मात्र पीडितेची झुंज अपयशी ठरली. डॉ. शलभ कुमार यांनी पीडितेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. 90 टक्के जळूनही पीडितेनं धीर सोडला नव्हता. 'उपचारादरम्यान मी वाचेन ना मला जगायचं आहे.' असा जप पीडित तरुणी सातत्यानं करत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

हैदराबाद प्रकरण: आरोपींना ताब्यात घेण्याआधीच 'या' कारणामुळे पोलिसांनी केला होता एन्काऊंटरचा प्लान

गुरुवारी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर गुरुवारी रात्री 9 वाजता ती शुद्धीत होती त्यावेळी आपल्या भावाकडून तिने आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी त्यांना सोडू नको असं वचन घेतलं होतं. त्यानंतर पीडित महिलेची प्रकृती अधिक खालवल्यानं तिला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा पीडितेचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. न्यायाची लढाई लढत असताना आणखी एक निर्भयाची मृत्यूसोबतची लढाई मात्र अपयशी ठरली.

उत्तर प्रदेशातील उन्नाव इथे जामिनावर तुरूंगातून बाहेर सुटलेल्या नराधमांनी पीडितेला गुरुवारी सकाळी जिवंत पेटवले. पीडिता 90 टक्के भाजली होती. तिला उपचारासाठी तातडीने लखनऊ ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं त्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्यानं दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभमने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केलं असल्याची माहिती मिळत आहे. शुभम आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर तीन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

इतर बातम्या - हैदराबाद एन्काऊंटरमागे या IPS अधिकाऱ्याचा हात, त्यांनी सांगितलेली INSIDE STORY

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंदुनगर पोलिस स्टेशन परिसरात गुरूवारी सकाळी ही घटना आहे. पीडिता बलात्कारप्रकरणी सुनावणीसाठी रायबरेली कोर्टात जात होती. रेल्वे पकडण्यासाठी ती पायी निघाली होती. तिच्या पाळतीवर असलेल्या आरोपी शुभम आणि शिवम त्रिवेदी आणि त्यांचे तीन साथीदारांनी पीडितेला अडवले. तिला काही समजण्याच्या आत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात पीडिता गंभीर भाजली होती. पीडितेने दिलेल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली आहे. पोलिसांनी आरोपी शुभम त्रिवेदी आणि त्याचे वडील हरिशंकर त्रिवेदी यांनी अटक केली आहे.

First published: December 7, 2019, 9:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading