राहत्या घरात आढळले 2 मृतदेह, 'या' गोष्टीमुळे वाढलं रहस्य

राहत्या घरात आढळले 2 मृतदेह, 'या' गोष्टीमुळे वाढलं रहस्य

जळालेल्या अवस्थेतील महिला आणि विष प्राशन केलेला पुरुष हे एकमेकांचे नातलग असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

नाशिक, 31 मार्च : नाशिकच्या पंचवटी परिसरात एका राहत्या घरात महिला जळालेल्या अवस्थेत तर पुरुष विष प्राशन केल्याच्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पहाटे सहा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले

जळालेल्या अवस्थेतील महिला आणि विष प्राशन केलेला पुरुष हे एकमेकांचे नातलग असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून देण्यात आली आहे. विष प्राशन केलेल्या पुरुषानेच या महिलेला जळल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हा सर्व प्रकार कोणत्या कारणावरून झाला हे मात्र अद्यापही समजू शकले नाही.

याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. तर एका घरात असा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण परिसरात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे शवविच्छेदनानुसार आता पोलीस पुढचा तपास करत आहेत. तर पोलीस मृतांच्या कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

कुऱ्हाडीने वार करत शिवसेना नगरसेवकाची हत्या, गुन्ह्यानंतर आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैयक्तिक वादातून शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अमरदीप रोडे असं नगरसेवकाचं नाव आहे. परभणी शहरातील जायकवाडी भागात हा प्रकार घडला आहे. दोन अज्ञात आरोपींकडून कुऱ्हाडीने वार करत अमरदीप यांची हत्या करण्यात आली आहे. अमरदीप आणि आरोपींमध्ये वैयक्तित वाद होते. त्याच रागात त्यांनी अमरदीप यांची निर्घृण हत्या केली.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे अमरदीप यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी स्वत: नवा मोंढा पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्हाची कबुली दिली. पण त्यांना यानंतर त्यांना अटक करण्यात आली की नाही याबद्दल पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दरम्यान, अमरदीप रोडो यांची अधिक माहिती मिळाली असता त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या नावे अनेक गुन्हे आहेत. भांडण आणि दादागिरीमुळे त्यांच्यावर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे आहेत. अशाच एका वादातून त्यांची हत्या झाल्याचं शक्यता वर्तवली जात आहे. पण यावर पोलीस काहीही बोलण्यास तयार नाहीत.

तर पोलिसांनी घटनास्थळावरून अमरदिप यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

VIDEO : आईचं डोकं जमिनीवर आपटून हत्या करणारा हैवान मुलगा

First published: March 31, 2019, 2:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading