S M L

भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीचं 'मिशन 400'

Ajay Kautikwar | Updated On: Jun 11, 2018 04:50 PM IST

भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीचं 'मिशन 400'

मुंबई,ता.11 जून : एकीचं बळ मिळतं फळ याची प्रचिती विरोधकांना नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमधून आली. आता पोटनिवडणुकांमधला हाच फॉर्म्युला 2019च्या लोकसभा निवडणुकीतही वापरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केलीय. विरोधकांच्या महाआघाडीनं तयारी सुरूवात केलीय ती मिशन 400 ची.

विरोधकांची ही एकजूट कुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये दिसून आली होती. ही आघाडी खरंच 2019च्या निवडणुकीत प्रत्यक्ष येईल का या चर्चांना तेव्हा सुरूवात झाली. पण ही एकी फक्त हात उंचावण्यापुरती नाही तर प्रत्यक्षातही पडद्यामागून याला सुरूवात झाल्याची माहिती मिळतेय.

विरोधकांनी सुरू केलंय मिशन 400. महाआघाडीच्या माध्यमातून देशातल्या हमखास विजय मिळतील अशा 400 जागा निवडण्यात आल्या आहेत. शरद पवारांनी भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं म्हणत याचं सुतोवाच केलं होतंकम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांच्या या योजनेला काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद आणि शरद यादवांनी पाठिंबा दिलाय. यासाठी अरविंद केजरीवाल, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती, के.चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्यात आलाय. काँग्रेस नेते या महाआघाडीसाठी आधीपासूनच अनुकूल आहेत.

दिल्लीच्या सत्तेचा मार्ग ज्या उत्तर प्रदेशातून जातो तिथं तर अखिलेश यादवांनी आघाडीसाठी पुढाकार घेतलाय. याच एकीमुळं उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर, फुलपूर, कैराना या प्रादेशिकरित्या तीन भिन्न ठिकाणी विरोधकांच्या आघाडीला यश आलंय. तिन्ही ठिकाणच्या समस्या आणि प्रश्न वेगळे होते.

तरीही मतदारांनी सत्ताधा-यांना नाकारत विरोधी आघाडीला मत दिलं. त्यामुळं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जोरदार धक्क बसलाय. त्यामुळंच वेळप्रसंगी बसपाला जास्त जागा देऊ पण दोघंही भाजपविरोधात एकत्रच लढू असं अखिलेश यादवांनी जाहीर केलंय.

Loading...
Loading...

या एकीमुळं अनेक पोटनिवडणुकांमध्ये विरोधकांचा दणदणीत विजय झाला होता. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी गेमप्लान तर तयार केलाय. सहमती तर झालीय पण खरा प्रश्न असणार आहे तो जागावाटपाचा. या जागावाटपाचा तिढा जर सुटला तर मग ही महाआघाडी भाजपसाठी खरी डोकेदुखी ठरणार आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 04:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close