सुषमा स्वराज यांच्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळातील 'या'ही नेत्याने घेतला मोठा निर्णय

सुषमा स्वराज यांच्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळातील 'या'ही नेत्याने घेतला मोठा निर्णय

केंद्रीय मंत्री उमा भारती या 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लढणार नाहीत, अशी घोषणा त्यांनी स्वत: भोपाळमध्ये केली आहे.

  • Share this:

मनोज शर्मा, प्रतिनिधी

नवी दिल्ली, 04 डिसेंबर : केंद्रीय मंत्री उमा भारती या 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लढणार नाहीत, अशी घोषणा त्यांनी स्वत: भोपाळमध्ये केली आहे. बरं इतकंच नाहीतर पुढची साडेतीन वर्ष निवडणुका लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राम मंदिर मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणार

उमा भारती म्हणाल्या की, गंगा आणि राम मंदिरसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यासाठी पुढची साडेतीन वर्षे कोणत्याही निवडणुका लढणार नाही.

दरम्यान, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपण 2019 साली होणारी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव सुषमा स्वराज यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतं होतं.

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज यांनी हा निर्णय जाहीर केला. तसंच आपल्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाबाबत स्वराज यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही माहिती दिली.

सुषमा स्वराज्य या सध्या मध्य प्रदेशमध्ये असून त्या तेथील विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करत आहेत. स्वराज या मध्य प्रदेशमधूनच भाजपच्या खासदार आहेत.

आजारी असल्याने सुषमा स्वराज लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, असा अंदाज अनेक दिवसांपासून बांधला जात होता. आता देखील आजारपणामुळे त्यांना अनेकदा सतत रुग्णालयात दाखल व्हावं लागल्याचं पाहायला मिळतं. स्वराज यांनी निवडणूक लढवण्याबाबत अखेर आपला निर्णय जाहीर केला.

दरम्यान, सुषमा स्वराज या भाजपमधील एक अनुभवी नेत्या आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपकडून त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

'मला फक्त एकदा त्यांना हात लावू द्या, ते बरे होतील'; पोलीस पत्नीचा अश्रू आणणारा VIDEO

First published: December 4, 2018, 3:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading