मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

JNU वाद: स्मृती इराणींनी दीपिकावर केला हा गंभीर आरोप

JNU वाद: स्मृती इराणींनी दीपिकावर केला हा गंभीर आरोप

'जे भारताचे तुकडे करण्याची भाषा करतात, ज्यांनी जेएनयुला राजकीय अड्डा बनवलाय अशा लोकांची दीपिकाने मदत केलीय.'

'जे भारताचे तुकडे करण्याची भाषा करतात, ज्यांनी जेएनयुला राजकीय अड्डा बनवलाय अशा लोकांची दीपिकाने मदत केलीय.'

'जे भारताचे तुकडे करण्याची भाषा करतात, ज्यांनी जेएनयुला राजकीय अड्डा बनवलाय अशा लोकांची दीपिकाने मदत केलीय.'

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 10 जानेवारी : अभिनेत्री दीपिका पदुकोनचा (Deepika Padukone) 'छपाक' आज देशभर रिलीज झाला आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. मात्र तिच्या JNU मध्ये जाण्यावरून सुरू झालेला वाद मात्र थांबण्याची चिन्हे नाहीत. सोशल मीडियावरून दीपिकावर टीका सुरू असतानाच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनीही दीपिकावर हल्लाबोल केलाय. दीपिकाने पहिले आपली राजकीय विचारसरणी जाहीर करावी आणि JNUमध्ये जाण्याचं कारण स्पष्ट करावं असं मत त्यांनी व्यक्त केलं. एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी दीपिकाला हा सवाल केलाय. इराणी म्हणाल्या, कोणी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र दीपिका तिथे का गेली याचं उत्तर तिने दिलं पाहिजे. ज्या लोकांना आझादी पाहिजे, जे भारताचे तुकडे करण्याची भाषा करतात, ज्यांनी जेएनयुला राजकीय अड्डा बनवलाय अशा लोकांसोबत तिने आपली सहानुभूती दाखवली आहे. त्यामुळे आम्हाला आक्षेप आहे. दीपिका ही काँग्रेसची समर्थक आहे. 2011मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत म्हणून सांगितलं होतं. हे लोकांना कळालं पाहिजे असंही त्या म्हणाल्या.

Jawaani Jaaneman Trailer: अम्मी का बेटा गे है! सैफचा स्वॅग आणि तब्बूचा ट्विस्ट

'छपाक' टॅक्स फ्री दीपिका जेएनयुमधल्या विद्यार्थ्यांना भेटायला गेली आणि वादाची ठिणगी पडली. 'छपाक'वर बहिष्कार घाला अशी मागणी होऊ लागली. तर त्याला जोरदार विरोधही सोशल मीडियावर करण्यात आलाय. भाजपने दीपिकावर टीकेची झोड उठवलीय तर काँग्रेस आणि विरोधीपक्षांनी तिला पाठिंबा दिलाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित तीन राज्यांनी दीपिकाच्या 'छपाक'ला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घोषीत केलाय. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगडने हा निर्मय घोषीत केलाय. 'छपाक' शुक्रवारी 10 जानेवारीला प्रदर्शित होतेय. तर त्या आधीच एक दिवस या राज्यांनी 'छपाक' टॅक्स फ्री केल्याने त्यावरही आता राजकारण सुरू झालंय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिलीय. काही नेटकरी दीपिकाच्या विरोधात बोलत आहेत तर काही नेटकऱ्यांनी दीपिकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ट्वीटरवर #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. छपाक सारखा सिनेमा करणारी दीपिका तुकडे-तुकडे गँगला भेटण्यासाठी गेली अशा टीका करत नेटकऱ्यांनी दीपिकाचा छपाक सिनेमा पाहू नका असा ट्रेंड सुरू केला आहे.
First published:

Tags: Deepika padukone, Smruti irani

पुढील बातम्या