‘देशात सध्या मेक इन इंडिया नाही तर...’, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ

‘देशात सध्या मेक इन इंडिया नाही तर...’, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ

झारखंडमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर सध्या लोकसभेत गदारोळ माजला असून स्मृती इराणींनी टीका केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी चार दिवसांपूर्वी ट्विटरवर तर झारखंडमध्ये एका सभेत मेक इन इंडियाची खिल्ली उडवली होती. राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये प्रचारादरम्यान एका सभेत ‘मेक इन इंडियाचे रेप इन इंडिया झाले आहे’, असे धक्कादायक वक्तव्य केले. या वक्तव्यावर लोकसभेत आज गदारोळ माजला. भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांनी सर्व महिलांची माफी मागावी अशी मागणी केली. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी शिक्षा झाली पाहिजे, असे लोकसभा अध्यक्षांना सांगितले.

राहुल गांधी यांच्या ‘मेक इन इंडिया’ नाही तर आता ‘रेप इन इंडिया’ झाला आहे या धक्कादायक वक्तवयावर यावर केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर टीका करण्यास सुरुवात केली. भाजप खासदारांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी अध्यक्षांकडे केली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या गोंधळानंतर डीएमकेच्या खासदार कनीमोळी यांनी राहुल गांधींची बाजू घेत, “त्यांना काय म्हणायचे आहे ते समजून घ्या”, असे सांगितले. मात्र त्यावर स्मृती इराणी आणखी संतापल्या. अखेर अध्यक्षांना 12 वाजेपर्यंत लोकसभा आणि राज्यसभा तहकूब करावी लागली.

शुक्रवारी लोकसभेत स्मृती इराणी यांनी, 'गांधी कुटुंबातील सदस्याने म्हटले आहे की महिलांवर बलात्कार झाला पाहिजे, देशातील प्रत्येकजण बलात्कारी नाही. कायद्यानुसार बलात्कार करणाऱ्यास शिक्षा होते. प्रत्येक स्त्री कलंकित होऊ शकत नाही, यावर कारवाई केली पाहिजे. ' असे म्हणत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला.

स्मृती इराणीबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधीवर टीका केली. लोकसभेव्यतिरिक्त, राज्यसभेतही राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती, परंतु राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी, ज्या सदस्याचे राज्यसभेत नाव नाही अशा सदस्याचे नाव घेता येणार नाही.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आधी कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात असेच विधान केले आणि भारतातील बलात्कार असल्याचे भारताचे वर्णन केले. मात्र, या वक्तव्यावरून झालेल्या गदारोळानंतर अधीर रंजन चौधरी यांनी दिलगिरी व्यक्त केली.

काय म्हणाले राहुल गांधी

गुरुवारी राहुल गांधींनी झारखंडमधील मेहराणा मेळाव्यात मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. या सभेत राहुल गांधी यांनी, 'नरेंद्र मोदी म्हणाले होते मेक इन इंडिया, आता तुम्ही जिथे जिथे बघाल तिथे मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया झाला आहे. जर तुम्ही वृत्तपत्रे पाहिलीत तर तुम्हाला कळेल की उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आमदारानं एक मुलीवर बलात्कार केला, त्यांनंतर तिचा अपघात घडवून आणला, यावर एका शब्दानं मोदी काही म्हणाले नाहीत. भारतात फक्त बलाक्तार होत आहेत”, या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 12:02 PM IST

ताज्या बातम्या