Home /News /news /

नारायण राणेंच्या भेटीला पोहोचले रिपब्लिकन पक्षाचे नेते, भेट घेऊन दिला हा सल्ला

नारायण राणेंच्या भेटीला पोहोचले रिपब्लिकन पक्षाचे नेते, भेट घेऊन दिला हा सल्ला

नारायण राणेंच्या जुहू येथील घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे.

    मुंबई, 26 ऑगस्ट: गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांना अटक झाली. त्यानंतर जामीन वर त्यांची सुटका ही झाली. या सर्व नाट्यानंतर बुधवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी थेट नारायण राणे यांचं निवासस्थान गाठलं. राणेंची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट सांगितलं. राणेंच्या जुहू येथील घरी दोघांची भेट झाली आहे. रामदास आठवले यांनी नारायण राणे यांना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला आहे. राणेंवर झालेली कारवाई ही अन्यायकारक असून चुकीची असल्याचंही आठवले म्हणालेत. राणे यांना पाठिंबा देण्यासाठी मी त्यांची भेट घेतली असल्याचं आठवलेंनी स्पष्ट केलं. पोलिसांनी राणे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे. मात्र, राणे हे अशा कारवाईनं डगमगणारे नेते नाहीत. ते खंबीर आणि नीडर नेते आहेत. या प्रसंगात मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष राणे यांच्या पाठिशी आहे, असे आठवले यांनी यावेळी सांगितले. तसंच दिल्लीत येऊन घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना द्यायला हवी. कशी चुकीची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आली ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी, असा सल्लाही आठवले यांनी राणेंना दिला आहे. बारकाईनं लक्ष ठेवा! राज्यातल्या 'या' 24 जिल्ह्यांमध्ये डेल्टा + व्हेरिएंटचा धोका यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, एम एस नंदा, प्रकाश जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Narayan rane, Ramdas athawale

    पुढील बातम्या