नागपूर, 27 नोव्हेंबर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या दिलखुलास आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. याच त्यांनी आता मार्केटिंग कसे करावे, यासंदर्भात उपस्थितांना मार्केटिंगचा सल्ला दिला. नागपूरात आयोजित करण्यात आलेल्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात ते बोलत होते.
काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -
जोवर कोणीतरी श्रीदेवी सांगत नाही की गडकरीकडचा साबण लावलं आणि मी गोरी झाली, तोवर गल्लीतली श्रीदेवी तो साबण वापरत नाही. मग साबण कितीही चांगला असू दे. बाजारात साहित्य विकणे एक कला आहे. फक्त चांगलं असून भागत नाही, तर चांगला दिसणं ही आवश्यक आहे. आजच्या काळात पॅकेजिंगला महत्त्व आहे, या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतमालापासून विविध उत्पादन तयार करणाऱ्या लहान उद्योजकांना उत्कृष्ट मार्केटिंग तंत्राचा सल्ला दिला.
जोवर कोणीतरी श्रीदेवी सांगत नाही की गडकरीकडचं साबण लावलं आणि मी गोरी झाली, तोवर गल्लीतली श्रीदेवी ती साबण वापरत नाही - नितीन गडकरी pic.twitter.com/YszMEn1lzz
— News18Lokmat (@News18lokmat) November 27, 2022
विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातीलनवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्याची माहिती व्हावी. तसेच त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा. त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 13 व्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा - Video : राज्यात गोवरचा प्रकोप पण नागपुरात एकही रुग्ण नाही, पाहा काय आहेत कारणं?
नागपुरात 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ऊस शेती, विदर्भात मत्स्य व्यवसायाचा विकास, बांबू उत्पादनातून संधी, विदर्भाचा दुग्ध विकास या मुख्यपरिषदांसह विविध विषयांवर विस्तृत कार्यशाळा होणार आहेत. या कृषी प्रदर्शनात सुमारे 450 दालन असून बायो सीएनजी वर चालणारा ट्रॅक्टरदेखील आहे. तसेच या कृषी प्रदर्शनात विविध कृषी निविष्ठाची दालन, कृषी अवजार, पतपुरवठा संस्था,बँक , कृषी संशोधन संस्था यांची दालन आहेत. यंदाच्या अॅग्रोव्हिजनची संकल्पना 'अन्न, चारा आणि इंधन' - भविष्यातील शेती' अशी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Business News, Nagpur News, Nitin gadkari