Load More
मुंबई, 5 जुलै : सगळ्या देशाचं लक्ष लागलंय ते आजच्या बजेटकडे (Budget 2019). मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर होतंय.निर्मला सीतारामन संसदेत पोचल्यात. यावेळी त्या सुटकेसऐवजी लाल चोपडी घेऊन आल्या. पहिल्यांदाच सुटकेसची परंपरा मोडली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitaraman) यांचं हे पहिलंच बजेट.
यावेळी अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. अर्थमंत्री अशा वेळी बजेट सादर करतायत ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी चांगली नाही.
बजेटच्या एक दिवस आधी इकाॅनाॅमिक्स सर्वे घोषित केलाय. यात सांगण्यात आलंय की 2019-20साठी देशाचा आर्थिक विकास दर (GDP) 7 टक्के असू शकतो. हा इकाॅनाॅमिक सर्वे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी तयार केलाय. यात त्यांनी देशाला जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था बनण्यासाठी ज्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे, तीही सांगितली आहेत.