अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक, आज आणणार भारतात

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक,  आज आणणार भारतात

रवी पुजारीला भारतात आणण्याचे सर्व कागदपत्रं पूर्ण झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आज रविवारी त्याला भारतात आणण्यात येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला भारतीय तपास यंत्रणांच्या मदतीने पश्चिम आफ्रिकेच्या सेनेगल इथे अटक करण्यात आली आहे. सध्या रॉचे अधिकारी आणि कर्नाटक पोलीस सेनेगलमध्ये हजर आहेत आणि अधिकारी त्यांच्या प्रत्यार्पणाची तयारी करत आहेत. जेव्हा रवी पुजारी शेवटचा पळाला होता तेव्हा तो सेनेगल येथून पळून गेल्याची माहिची समोर येत आहे.

रवी पुजारीला भारतात आणण्याचे सर्व कागदपत्रं पूर्ण झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आज रविवारी त्याला भारतात आणण्यात येईल. जेव्हा रवी पुजारीला भारतात आणलं जाईल तेव्हा तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात राहिल. रवी पुजारीला विमानात बसवण्यात आलं आहे. त्याला कोणत्याही क्षणी भारतात आणलं जाऊ शकतं.

मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अँटोनी फर्नांडिसच्या नावाने पासपोर्ट बनवून सेनेगलमध्ये राहत होता. हा पासपोर्ट 10 जुलै 2013 रोजी जारी करण्यात आला होता, जो 8 जुलै 2023 पर्यंत वैध आहे.

पासपोर्टनुसार, तो एक व्यावसायिक एजंट आहे. याचा अर्थ असा की, तो एक व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. जो सेनेगल, बुर्किना फासो आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये 'नमस्ते इंडिया' नावाच्या रेस्टॉरंट्स चालवितो. भारतीय गुप्तचर संस्था रॉ सध्या रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

जून 2019 मध्ये झाला होता फरार

गेल्या वर्षी जूनमध्ये सेनेगल कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी फरार झाला होता. त्याला 21 जानेवारी 2019 रोजी सेनेगल येथे भारतीय एजन्सीच्या इनपुटवरून अटक करण्यात आली होती. रवी पुजारी हा आफ्रिकी देशात सेनेगलमध्ये राहत होता. भारतीय एजन्सी सतत त्याच्यावर नजर ठेवत होती. आता त्याला भारतात आणण्याची तयारी सुरू आहे.

रवी पुजारीवर कर्नाटक-महाराष्ट्रात 98 प्रकरणं

रवी पुजारीने बॉलिवूड स्टार आणि अगदी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनाही हद्दपार करण्याची धमकी दिली होती. त्याच्याविरूद्ध कर्नाटक आणि मुंबई इथे 98 खटले प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणींनी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलीस तक्रार दिली होती.

जिग्नेश म्हणाले होते की, त्यांना फोन कॉल्स आणि मेसेज करून धमकवण्यात आलं होतं आणि धमकी देणारा रवी पुजारी असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. जिग्नेश यांना फोन करणाऱ्या व्यक्तीने दावा केला होता की त्याचं नाव रवी पुजारी आहे आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्याने म्हटलं होतं की मेवाणींना गोळी मारू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 06:45 AM IST

ताज्या बातम्या