ज्या हाताने मुलीला लावली हळद, त्याच हातात पडल्या बेड्या!

ज्या हाताने मुलीला लावली हळद, त्याच हातात पडल्या बेड्या!

पुण्यातील लोणीकंद बुर्केगाव इथं मुलीच्या मर्जीविना दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांनी बळजबरीने लग्नमंडपातील बोहल्यावर चढवल्याची धक्कादायक घटना घडली

  • Share this:

 

लोणीकंद, 01 फेब्रुवारी :  लग्न म्हटलं की, दोन कुटुंबांना एकत्र आणून सुखी संसाराची स्वप्न नवरा-नवरी पहात असतात. मात्र,  कायदा न पाळल्यामुळे पुण्यातील लोणीकंद बुर्केगाव येथे पंधरा वर्षीय मुलीला विवाह बंधनात अडकवल्याने दोन्ही कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलाचे 21 तर मुलीचे वय  18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच विवाह कायद्यानं मान्य केला जातो. मात्र, सध्या अनेक ठिकाणी हा कायदा पायदळी तुडवला जात आहे. यातून अल्पवयीन मुलीला संसारात गुंतवले जात आहे. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे.

पुण्यातील लोणीकंद बुर्केगाव इथं मुलीच्या मर्जीविना दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांनी बळजबरीने लग्नमंडपातील बोहल्यावर चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा आला प्रकार उजेडात?

एका निनावी फोनद्वारे अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदीनी जाधव यांना ही माहिती पोहोचली. हा विवाह आळंदीत होणार असल्याचं त्यांना समजलं होतं. मात्र, कुटुंबीयांना याबाबत कुणकुण लागली आणि त्यांनी आळंदीतून मुला मुलीला हलवलं आणि दुसरीकडे नेऊन लग्न लावलं. पण शेवटी पोलिसांनी या प्रकरणी कुटुंबांचा शोध लावला.

देश औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करत असताना आजही समाजात अल्पवयीन मुलींना त्यांची शारीरिक वाढ पूर्ण होण्याच्या आधीच लग्नाच्या बंधनात अडकवलं जात आहे. मात्र असे विवाह होऊ न देणे ही सामाजिक बांधिलकी सुद्धा जपणे हिताचे आहे.

  'कामावर जा आणि पैसे कमव', 75 वर्षांच्या आईला मुलांनी काढले घराबाहेर

दरम्यान, पैसे कमवून आणत नाही म्हणून वृद्ध आईला पोटच्या मुलांनीच घरातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यामध्ये घडला. 'शेतात कामाला जा आणि कमवून आण,' असा तगादा लावत कामावर जात नाही म्हणून एका 75 वर्षीय जन्मदात्या आईलाच चक्क पोटच्या मुलांनी घरातून हाकलून दिलं.

मुलांनी घरातून हाकलून दिल्यावर वृद्ध आई खामगावच्या सामान्य रुग्णालयाचा सहारा घेत कसेबसे जीवन जगत आहे. या हृदयद्रावक घटनामुळे परिसरातील नागरिकांचे मन हेलावले असून वृद्ध आईने पोलिसांत तक्रार दिल्यावर आता पोलिसांनी त्या वृद्ध आईला सुखरूप घरी पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

द्वारकाबाई महादेव पल्हाडे , वय 75 वर्ष ही वृद्ध महिला आपल्या 2 मुले, सून आणि नातवंडांसह पळशी बु. येथे राहत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी  द्वारकाबाई पल्हाडे यांना त्यांचा मुलगा सहदेव आणि  वासुदेव पल्हाडे यांनी घरातून हाकलून दिलं. तर सुनांनी शिवीगाळ करत मारहाणही केली, असा असा द्वारकाबाई यांचा आरोप आहे. ही घटना घडल्यावर या वृद्ध महिलेने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठीत त्यांच्या दोन मुलांच्या नावे तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना विचारले तर धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'मला दोन मुले असून त्यांची नावे सहदेव आणि वासुदेव आहेत. तू कामावर जा आणि कमवून आणून दे , असा तगादा या  मुलांनी लावला. मात्र, आपले वय झाल्याने आपल्याने काम होत नाही, असे सांगितल्यावरून मुलांनी आपल्याला घरातून हाकलून दिलं तसंच शिवीगाळ आणि मारहाणही केली आहे,' असं वृद्ध महिलेनं पोलिसांना सांगितलं.

दरम्यान, या वृद्ध महिलेकडे जवळपास 12 एकर शेती असून मुले शेती करतात. मात्र, या वृद्ध आईला या वयात मुलांकडून जी अपेक्षा आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. अशा पद्धतीने जन्मदात्या आईलाच काम होत नाही आणि कमवून आणत नाही म्हणून घराबाहेर काढल्याने संताप व्यक्त करण्यात येत.

First published: February 1, 2020, 5:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading