'सत्ता डोक्यात गेली, राज्यात अघोषित आणीबाणी'; देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर बरसले

'सत्ता डोक्यात गेली, राज्यात अघोषित आणीबाणी'; देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर बरसले

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'सत्ता यांच्या डोक्यात गेली असून राज्यात अघोषित आणीबाणी आहे. महाराष्ट्राची सामाजिक घडी विसकटत आहे,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला कात्रीत पकडण्याचाही प्रयत्न या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत केला आहे. ' राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. या विषयाबाबत सरकार गंभीर नाही. सरकारचे मंत्री आणि प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये जाऊन स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. ओबीसी समाजाच्या मनात भयाचे वातावरण असून सरकारची बोटचेपी भूमिका आहे,' असं म्हणत फडणवीस यांनी आरक्षणप्रश्नी सरकावर गंभीर आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

मेट्रो कारशेड - सरकारी अहवालात कांजुरमार्गला नेल्यास नुकसान होईल अशी नोंद. अहवाल डावलून कारशेड कांजूरला करण्यात येतं आहे. राजकीय हेतुने मुंबई मेट्रो 4 वर्षाने पुढे जाणार

- विद्युत बिलाबाबत सरकारनं घुमजाव केलं

- कोरोनाच्या काळात मोठा भ्रष्टाचार

- हे मन विषण्ण करणारं आणि संताप आणणारं आहे

- सरकार कशाबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतंय हे अनाकलनीय

- महिलांवरचे अत्याचार राज्यात वाढले आहेत.

- शक्ती कायद्याला या अधिवेशनात आणणार असतील तर चर्चेला वेळ कधी देणार काय माहिती? या कायद्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे

- या विषयावर प्रभावी कायदा झाला पाहिजे

- गेल्या काही काळात, कोव्हिड सेंटरमध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले आहेत

Published by: Akshay Shitole
First published: December 13, 2020, 5:07 PM IST

ताज्या बातम्या