उमरेडच्या स्ट्राँग रुममधून CCTV चे रेकॉर्डिंग असलेले DVR आणि TV संच गायब

उमरेडच्या स्ट्राँग रुममधून CCTV चे रेकॉर्डिंग असलेले DVR आणि TV संच गायब

रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील मतदार सुरक्षा केंद्रातून सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर आणि टीव्ही संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परंतु, ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्य आधीच नागपुरात पोहोचते केल्याने चोरीला गेलेले साहित्य महत्त्वपूर्ण नसल्याचा निर्वाळा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, (प्रतिनिधी)

नागपूर, २६ एप्रिल- रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील मतदार सुरक्षा केंद्रातून सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर आणि टीव्ही संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

परंतु, ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्य आधीच नागपुरात पोहोचते केल्याने चोरीला गेलेले साहित्य महत्त्वपूर्ण नसल्याचा निर्वाळा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

या प्रकरणात पोलिस तपास सुरु असून दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. यापूर्वी नागपूर लोकसभा मतदार संघातील तात्पुरत्या स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही लाईट गेले असताना काम करत नाही, अशी तक्रार काँग्रेसने केली होती. त्यात या प्रकारामुळे वादात आणखी भर पडली आहे.

रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उमरेड विधानसभा क्षेत्रात एकूण ३८४ मतदार केंद्र होते. या संपूर्ण मतदान केंद्रासाठी उमरेड येथील शासकीय औद्योगिक संस्थेची स्ट्राँग रुमसाठी निवड करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सुरक्षा केंद्रावर करडी नजर ठेवण्यासाठी आणि साहित्य सुरक्षित असावे, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. साधारणत: मार्च अखेरपासूनच येथील स्ट्राँग रुमवर एका पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात २४ तास कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात होता. सदर मतदान सुरक्षा केंद्रावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे डीव्हीआर आणि टीव्हीसंच चोरीला गेले आहेत.

काय म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकारी

लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी ईव्हीएम आणि मतदानाचे साहित्य प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तात्पुरत्या स्ट्राँगरुममध्ये मतदानाच्या दोन - तीन दिवसाआधीच पोहचल्या जातात. मतदानानंतरही ईव्हीएमही याच स्ट्राँगरुममध्ये गोळा करून त्या मुख्य स्ट्राँगरुम मध्ये पोहचवल्या जातात. रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उमरेड विधानसभा क्षेत्रात एकूण ३८४ मतदार केंद्र होते आणि या संपूर्ण मतदान केंद्रासाठी उमरेड येथील शासकीय औद्योगिक संस्थेची स्ट्राँग रुमसाठी निवड करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सुरक्षा केंद्रावर करडी नजर ठेवण्यासाठी आणि साहित्य सुरक्षित असावे याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. पण मतदान सुरक्षा केंद्रावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे डीव्हीआर आणि टीव्हीसंच चोरीला गेले आहेत.

- श्रीकांत फडके, अप्पर जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, रामटेक लोकसभा

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमरेड येथील या सुरक्षा केंद्रावर करडी नजर ठेवण्यासाठी आणि साहित्य सुरक्षित असावे याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. उमरेड येथील स्ट्राँग रुमवर एका पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात 24 तास कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात होतार मतदान सुरक्षा केंद्रावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठीचे डीव्हीआर आणि टीव्हीसंच गहाळ झाले आहेत. पण ईव्हीएम या केंद्रावरून हलविण्यात आल्याने कुठलेही नुकसान झाले नाही. ईव्हीएम सुरक्षित आहेत.

नाना पटोलेंनी उपस्थित केले उपस्थित केले

नागपूर लोकसभा मतदार संघातील पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील तात्पुरत्या स्ट्राँग रुम मधील सीसीटीव्ही लाईट गेले असतांना काम करत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या हाती या प्रकरणामुळे आयत कोलीत आल आहे. या प्रकरणात काँग्रेसने प्रकरण गंभीर असल्याच सांगत ईव्हीएमवरच म उपस्थित केले आहे.

- नाना पटोले, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस

या  प्रकरणात पोलिस चौकशी करताहेत आणि दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याच प्रशासनाचे म्हणन आहे. हे साहित्य चोरीला गेल्यामुळे निवडणूक अथवा मतमोजणीच्या प्रक्रियेला कुठलीही बाधा पोहचणार नाही, असा निर्वाळा प्रशासनाने दिला आहे. पण या प्रकरणात चौकशीची मागणी उमेदवारांनी केली आहे. या प्रकरणामध्ये सीसीटीव्ही आणि डिव्हीआरच का चोरट्यांनी चोरले याचा  तपास व्हावा, अशी मागणी आहे.

- किशोर गजभिये, उमेदवार काँग्रेस, रामटेक लोकसभा मतदार संघ

VIDEO: भाजपच्या 'या' मुस्लीम नेत्यानं साध्वी प्रज्ञांचा प्रचार करण्यास दिला थेट नकार

First published: April 26, 2019, 2:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading