पेट्रोल पंपावर तरुणाने महिला कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली, धक्कादायक VIDEO

पेट्रोल पंपावर तरुणाने महिला कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली, धक्कादायक VIDEO

पेट्रोल पंपावर मोबाईल फोन बंद करण्याची सुचना करण्यात आलेली असते. परंतु, तरीही काही जण मोबाईल फोनचा सर्रास वापर करतात.

  • Share this:

गणेश गायकवाड, प्रतिनिधी

उल्हासनगर, 20 फेब्रुवारी :  पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणाने पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. पेट्रोल भरत असताना मोबाईल बंद करण्यासाठी सांगितल्याचा राग आल्याने महिला कर्मचारीला मारहाण करण्यात आली आहे.

हा सगळा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बुधवारी रात्री ९च्या सुमारास विठ्ठलवाडी भागातील भारत पेट्रोल पंपावर एक तरुण पेट्रोल भरण्यासाठी आला होता. मात्र, पेट्रोल भरत असताना  तो मोबाईलवर बोलत  होता. त्यावेळी फोन बंद करण्यासाठी महिला कर्मचाऱ्याने त्याला सांगितलं. परंतु, या तरुणाने त्याकडे दुर्लक्ष केलं. पुन्हा एकदा या महिलेनं त्याला सांगितले असता या तरुणाला राग अनावर झाला. पेट्रोल भरून झाल्यावर तो पुन्हा मागे आला आणि या महिलेच्या अंगावर धावून गेला. शिवीगाळ करत या महिलेला मारहाण केली.

पेट्रोल पंपावरच तरुण आणि महिला कर्मचाऱ्यामध्ये झटापट सुरू असल्यामुळे इतर कर्मचारी मदतीसाठी धावून आले. अखेर या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tiktok व्हिडिओ बनवतात धावत्या रेल्वेत स्टंटबाजी

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झालेल्या एका व्हिडिओने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला होता. Tiktok साठी व्हिडिओ बनवतात धावत्या रेल्वेत स्टंटबाजी करणारा तरुण जीव गमावता गमावता वाचला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनीही हात जोडलेत आणि असं करणं म्हणजे बहादुरी नव्हे तर मूर्खपणा असल्याचं त्यांनी म्हटलं.

हा तरुण एक्स्प्रेसच्या दारात उभा राहिला आणि स्टंट करत होता. अचानक त्याचा हात सुटला आणि तोल जाऊन तो रेल्वेखाली आला. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका क्षणाला वाटलं की हा तरुण गेलाच की काय मात्र दुसऱ्याच क्षणाला तो सुखरूप असल्याचं दिसताच सुटकेचा श्वास सुटतो. धावत्या रेल्वेत असे स्टंट वारंवार केले जातात आणि त्याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी नागरिकांना सावध केलं आहे.

"चालत्या ट्रेनमध्ये स्टंट करणं धाडसाची नाही, तर मूर्खपणाची निशाणी आहे. तुमचं जीवन अमूल्य आहे, त्याला धोक्यात टाकू नका. नियमांचं पालन करा आणि सुरक्षित यात्रेचा आनंद घ्या", असं ट्विट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे.

हा व्हिडिओ कुठला आहे हे माहिती नाही. या तरुणाचं नशीब बलवत्तर म्हणून सुदैवानं त्याचा जीव वाचला. मात्र प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही, त्यामुळे नागरिकांनो असं करू नका, असं आवाहन रेल्वे मंत्रालयाने केलं आहे.

First published: February 20, 2020, 6:38 PM IST

ताज्या बातम्या