मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

IPL 2021 मॅचवर बेटिंग करायला गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, उल्हासनगरात NCP नगरसेवकाच्या मुलाला बेड्या

IPL 2021 मॅचवर बेटिंग करायला गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, उल्हासनगरात NCP नगरसेवकाच्या मुलाला बेड्या

NCP Corporator son arrested while betting on IPL 2021 match: आयपीएल मॅचवर बेटिंग करणाऱ्यांना बेड्या, अटक कऱण्यात आलेल्यांमध्ये नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे.

NCP Corporator son arrested while betting on IPL 2021 match: आयपीएल मॅचवर बेटिंग करणाऱ्यांना बेड्या, अटक कऱण्यात आलेल्यांमध्ये नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे.

NCP Corporator son arrested while betting on IPL 2021 match: आयपीएल मॅचवर बेटिंग करणाऱ्यांना बेड्या, अटक कऱण्यात आलेल्यांमध्ये नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे.

  • Published by:  Sunil Desale

उल्हासनगर, 6 ऑक्टोबर : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2021  (IPL 2021) क्रिकेट टूर्नामेंटमधील मॅचेसवर बेटिंग (Betting on IPL 2021 match) करणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे. नगरसेवकाच्या मुलाला बेटिंग प्रकरणात अटक (NCP corporator son arrested) करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. उल्हासनगर (Ulhasnagar) पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सतरामदास जेसवानी यांचा मुलगा गिरीश याला बेटिंग प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. गिरीश जेसवानी हा आयपीएलमधील दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यावर बेटिंग लावत होता. एका मोबाइल अॅपच्या सहाय्याने हे बेटिंग सुरू होतं.

उल्हासनगर क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांना बेटिंग प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले व्यक्ती हे क्रिकेट माझा या मोबाइल अॅपच्या माध्यमातून बेटिंग करत होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन मोबाइलसह इतरही काही सामान जप्त केले आहे.

गेल्या तीन दिवसांत दुसरी कारवाई

उल्हासनगर पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत बेटिंग करणाऱ्यांवर केलेली ही दुसरी कारवाई आहे. शनिवारी उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत बेटिंग करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आता नगरसेवकाच्या मुलासह अन्य एकाला अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डोंबिवली हादरली, छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळला मृतदेह

डोंबिवलीमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. रिक्षातून जाणाऱ्या दोन तरुणांना चाकूचा धाक दाखवून निर्जनस्थळी नेऊन लुटण्यात आले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून रेल्वे रुळालगत छिन्नविच्छीन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये खळबळ उडाली आहे.

ठाकुर्ली परिसरातील रेल्वे समांतर रोडवर ही घटना घडली आहे. बेचनप्रसाद चौहान असं मृत तरुणाचं नाव आहे. तर बबलु चौहान असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. बेचनप्रसाद चौहानचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

रात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वे समांतर रस्त्यावर काही जणांनी त्यांची रिक्षा अडवली. दोघांना बाहेर काढले आणि रिक्षाचालकाला पळवून लावले. त्यानंतर दोघांनाही चाकूचा धाक दाखवून ठाकुर्ली- कल्याण दरम्यान रेल्वे रुळाजवळ नेण्यात आले होते. तिथे नेल्यावर दोघांवर चाकूने वार करण्यात आले. पण, सुदैवाने बबलूने कशीबशी सुटका करून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, बेचन तिथेच अडकला. जीवमुठीत धरून बबलू आपल्या परिसरात परत आला. त्याने या घटनेबाबात स्थानिक भाजप जिल्हाध्यक्ष कांबळे यांना माहिती दिली.

First published:

Tags: Crime, IPL 2021, Ulhasnagar