प्रभारी आयुक्तांच्या अंगात संचारला नायकचा 'अनिल कपूर'

पदभार हाती घेताच आयुक्तांनी सर्व महत्वाची खाती स्वत:कडे स्वताच ऑर्डर काढून घेतले, आणि यापूर्वी आयुक्तानी घेतलेल्या निर्णयाला एकतर स्थगिती दिली नाही तर रद्द केले.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2017 09:26 PM IST

प्रभारी आयुक्तांच्या अंगात संचारला नायकचा 'अनिल कपूर'

03 जून : "नायक" या हिंदी चित्रपटात अनिल कपूर याला एका दिवसा साठी मुख्यमंत्री दाखवण्यात आलं. जसा अनिल कपूर मुख्यमंत्री म्हणून तडका फडकी निर्णय घेतो असाच नाट्यमय प्रकार उल्हासनगर महापालिकेत आयुक्तपदा बाबतीत पाहावयास मिळाला आहे. पदभार हाती घेताच आयुक्तांनी सर्व महत्वाची खाती स्वत:कडे स्वताच ऑर्डर काढून घेतले, आणि यापूर्वी आयुक्तानी घेतलेल्या निर्णयाला एकतर स्थगिती दिली नाही तर रद्द केले.

औट घटकेचे आयुक्त श्रीमती विजया कंठे यांचा हा प्रताप नगरविकास खात्याकडे पोहचला आणि नगरविकास खात्याला तातडीने आदेश काढून उल्हासनगर महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे सोपवावा लागला.

उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली पनवेल महापालिकेत झाल्यानंतर शिंदे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या प्रभारी आयुक्त म्हणून अतिरिक्त आयुक्त विजया कंठे यांच्याकडे पदभार दिला. हा पदभार काही दिवसांसाठी असला तरी महापालिकेत नायक चित्रपटा सारख्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.

काही दिवसांसाठी प्रभारी आयुक्तपद मिळताच कंठे यांनी काही तासात आयुक्त केबिन समोर आपल्या नावाचा नामफलक  लावण्याची घाई केली. तसंच प्रभारी असतांनाही आयुक्त म्हणून आपले नाव पाटीवर त्यांनी लावले. एवढंच कमी की काय तर महापालिकेतील सर्व प्रमुख पदही त्यांनी आपल्याकडे घेतली. तसंच तत्कालीन आयुक्त शिंदे यांनी केलेल्या २७ कर्मचाऱ्याच्या आणि  १२०० सफाई कर्मचाऱ्याच्या  ही कंठे यांनी पहिल्याच दिवशी थांबवल्या. त्यामुळे त्यांच्या या हालचालीमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. त्यानंतर ही माहिती मंत्रालयाच्या ud म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट विभागाला काळातच त्यांनी तत्काळ महापालिकेचा अतिरिक्त भार हा पनवेल महापालिकेचे आयुक्त शिंदे याच्याकडे सोपवला आहे. या अचानक घेतलेल्या निर्णय बद्दल महापौर मीना अयलानी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2017 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...