S M L

उल्हासनगर,अंबरनाथचा परिसरही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

उल्हासनगर आणि अंबरनाथच्या काही भागात हादरे जाणवल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे

Updated On: Jul 14, 2018 02:24 AM IST

उल्हासनगर,अंबरनाथचा परिसरही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

उल्हासनगर,13 जुलै : उल्हासनगर आणि अंबरनाथच्या काही भागात भूकंपाचे हादरे जाणवल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे.उल्हासनगरच्या खेमानी, म्हारळ, सेंच्युरी रेयॉनच तर अंबरनाथच्या न्यु भेंडीपाडा,बुवापाडा परिसरात घरात असलेल्या नागरिकांना हे धक्के जाणवल्याचे नागरिक सांगत आहेत. हादरे बसल्यानंतर घाबरून अनेक नागरिक घराबाहेर आले होते.

दरम्यान, सोशल मीडियावर लगेचच या संबंधीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. कल्याण-डोंबिवली परिसरात जाणवलेले धक्के हे भुकंपाचे धक्के होते. रायगड जिल्ह्यात जमीनीखाली ५ किमी खोलीवर या भुकंपाचे केंद्र होते. त्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

गूढ धक्क्यांनी हादरला कल्याण डोंबिवलीचा परिसर !

तर रात्री 9 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात अचानक कंपनं आणि हादरे बसण्यास सुरुवात झाली. साधारणपणे 9 वाजून 32 मिनिटांपर्यंत म्हणजेच सुमारे 1 ते 2 मिनिटं हे हादरे जाणवल्याची माहिती कल्याण डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी दिली. अचानक बसलेल्या या गूढ हादऱ्यांनी कल्याणच्या अनेक भागात नागरिक घाबरून घराबाहेर जमा झाले. तर हादऱ्यांमुळे काही जणांच्या घरातील भांडी पडल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शीनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 11:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close