ब्रिटनने भारताचं निमंत्रण स्वीकारलं, बोरिस जॉन्सन 26 जानेवारीला मुख्य पाहुणे

ब्रिटनने भारताचं निमंत्रण स्वीकारलं, बोरिस जॉन्सन 26 जानेवारीला मुख्य पाहुणे

जॉन्सनहे प्रजासत्ताक सोहळ्यातल्या कार्यक्रमात येणारे ब्रिटनचे दुसरे पंतप्रधान आहे. या आधी 26 जानेवारीच्या सोहळ्यात 1993मध्ये जॉन मेजर हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.

  • Share this:

नवी दिल्ली 15 डिसेंबर: ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Borish Jhonson) हे 26 जानेवारीला (26 Jan 2021) होणाऱ्या गणतंत्र दिवस (Republic Day) च्या कार्यक्रमात मुख्य पाहुणे असणार आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी ही माहिती दिली. भारताने दिलेलं निमंत्रण ब्रिटनने स्वीकारलं असून जॉन्सन हे भारतात येतील असं राब यांनी सांगितलं. जॉनसन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आमंत्रित केलं होतं.

जॉन्सन हे प्रजासत्ताक सोहळ्यातल्या कार्यक्रमात येणारे ब्रिटनचे दुसरे पंतप्रधान आहे. या आधी 26 जानेवारीच्या सोहळ्यात 1993मध्ये जॉन मेजर हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 नोव्हेंबरला जॉन्सन यांच्यासोबत फोनवरून चर्चा करत त्यांना आमंत्रित केलं होतं. तर जॉन्सन यांनी पंतप्रधानांना पुढच्या वर्षी ब्रिटनमध्ये होणाऱ्या G7 देशांच्या शिखर परिषदेसाठी येण्याचं निमंत्रण दिलं.

ब्रिटेनमध्ये बेक्झिटची प्रक्रिया सुरू असताना जॉन्सन यांचा हा दौरा होत असून भारतासारख्या मोठी अर्थव्यवस्था आणि मार्केट असलेल्या देशांसोबत ब्रिटनला संबंध आणखी मजबुत करणं गरजेचं आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जॉन्सन यांच्या या दौऱ्यात भारत आणि ब्रिटनमध्ये व्यापारी करार होण्याची शक्यता आहे. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी एका विदेशी राष्ट्रप्रमुखाला मुख्य पाहुणे म्हणून बोलावण्याची प्रथा आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 15, 2020, 3:43 PM IST

ताज्या बातम्या