02 डिसेंबर : मध्यप्रदेशमधील उज्जैन येथील प्रिया तिवारीने मिस भारत अर्थ 2017 चा किताब पटकावलाय. शिमला येथील एका कार्यक्रमात हा किताब तिने पटकावलाय. प्रियाचे वडील उज्जैनमध्ये पानटपरी चालवतात.
मिस भारत अर्थ झाल्यानंतर, "माझी वडील उज्जैनमध्ये सगळ्यात सर्वोत्तम पान बनवतात. मी आज जे काही कमावलं ते माझ्या वडिलांमुळेच शक्य झालंय. आई-वडिलांच्या आशिर्वादामुळे मी आज मिस अर्थ होऊ शकले" अशी भावना प्रियाने व्यक्त केली.
उज्जैनची राहणाऱ्या प्रियाला माॅडेलिंगची आवड होती. प्रियाने इंटरिअर डिझायनरचं शिक्षण घेतलंय आणि मुंबईला पोहोचली. मुंबईत आल्यावर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं. या व्यतिरिक्त तिने काही म्युझिक अल्बममध्येही काम केलंय.
शिमला इथं शांतता आणि दहशतवादाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मिस भारत अर्थ सौंदर्यस्पर्धेत प्रियाने सहभाग घेतला. या स्पर्धेत वेगवेगळ्या राज्यातून 20 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा