मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /संशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका

संशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका

या मार्गदर्शिकेचं नाव Good Academic Research Practices असे आहे.

या मार्गदर्शिकेचं नाव Good Academic Research Practices असे आहे.

या मार्गदर्शिकेचं नाव Good Academic Research Practices असे आहे.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : UGC ने मंगळवारी विद्यापीठांतून संशोधन करणाऱ्यांसाठी एक मार्गदर्शिका जाहीर केली आहे. या मार्गदर्शिकेचं नाव Good Academic Research Practices असे आहे. ही मार्गदर्शिका संशोधकांसाठी उपयुक्त माहिती असणार आहे. उदाहरणार्थ डिझाइन, नियोजन,अभ्यासासाठीची कागदपत्रं, संग्रहित डेटा तसेच संशोधनावेळी झालेली गडबड किंवा गैरवर्तणूक, संशोधनकर्त्यांना आलेले अनुभव याचीही माहिती या लेखांमध्ये असणार आहे.

या मार्गदर्शिकेमध्ये संशोधनासंदर्भात फक्त चांगल्या गोष्टी नाही तर संभाव्य धोक्यांचीही माहिती दिली आहे, असं इंडियन एक्सप्रेसने म्हटलं आहे. ही मार्गदर्शिका क्लॅरिव्हेट्स ऑफ सायन्स यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. क्लॅरिव्हेट्स ऑफ सायन्सने 34,000 हून अधिक जर्नल्सची प्रकाशने केली आहेत. या मार्गदर्शिकेमध्ये संशोधकांसाठी उपयुक्त माहिती असणार आहे.

वाचा-Flipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती! फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी

या मार्गदर्शिकेमध्ये संशोधकाने समस्यांचे हे मुद्दे कसे तपासायचे, लेखांचे अर्थ कसे लावायचे, तसेच आपले शोध निबंध पुढच्या पिढीला कसे उपयोगी होईल, आपल्या शोध निबंधामध्ये कोणत्या प्रकारचे मुद्दे असले पाहिजेत आणि कोणते नको हे मार्गदर्शन या मार्गदर्शिकेतून करण्यात येईल.

या संदर्भात युजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला सांगितले की, ही मार्गदर्शिका नक्कीच संशोधकांना त्यांच्या संशोधनासाठी उपयुक्त असेल. संशोधनाची गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे त्यासाठी संशोधनकांना अशाप्रकारे मार्गदर्शन मिळणे महत्वाचे आहे त्यामुळे संशोधनाची गुणवत्ता नक्कीच वाढण्यास मदत होईल.

वाचा-सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

ही मार्गदर्शिका प्रकाशित करून युजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. डॉ. पटवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील विद्वान संशोधकांसाठी अशा प्रकारची मार्गदर्शिका संशोधन संस्कृतीचा पाया तयार करू शकेल जे दररोजच्या संशोधन पद्धतींमध्ये अखंडतेवर भर देतात.

वाचा-SBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज! आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा

यूजीसी अशा विद्वान संशोधकांसाठी त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील संशोधन प्रकल्पांसाठी अनुदान देते. यूजीसीच्या वतीने, भारतातील इच्छुक संशोधकांसाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नेट) आयोजित केली जाते.

First published:
top videos