धुमधडाक्यात लग्न करून घरी आणलेली बायको निघाली पुरुष, सत्य वाचून हडबडाल!

धुमधडाक्यात लग्न करून घरी आणलेली बायको निघाली पुरुष, सत्य वाचून हडबडाल!

धुमधडाक्यात लग्न झालं पण जीला बायको म्हणून घरी आणलं ती स्त्री नसून पुरुष असल्याचं समोर आलं.

  • Share this:

युगांडा 15 जानेवारी : फसवणुकीच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मग ती फसवणूक प्रेमात असो वा पैशात. प्रेमात फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकरण असं की, धुमधडाक्यात लग्न झालं पण जीला बायको म्हणून घरी आणलं ती स्त्री नसून पुरुष असल्याचं समोर आलं. हा प्रकार समजल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरली. इतकंच नाही तर नवरदेवाने रागात बायको म्हणून घरी आणलेल्या पुरुषाची पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याबाबत नीट तपासणी सुरू केली तेव्हा पोलिसांना असे समजले की, तो पुरुष दुसरा-तिसरा कोण नसुन एक चोर आहे. ही घटना युगांडामध्ये घडली आहे. युगांडामधील कांयुगा या जिल्ह्यामध्ये नवदेव शेख मोहम्मद मुटुंबा यांनी दोन आठवड्याआधी स्वबुल्लाह नाबुकीरासोबत धूमधाम पद्धातीने लग्न केले. लग्नानंतर तिला घेऊन शेख मोहम्मद मुटुंबा हे त्यांच्या घरी गेले.

नवं जोडपं घरी पोहोचताच पोलिसही घरी आले. आणि त्यांनी तुमच्या घरी चोर असल्याचं म्हटलं. पोलिसांनी सांगितले की, आम्ही एका चोराच्या शोधात आहोत. त्याने टीव्ही आणि कपडे चोरले आहेत. या सगळ्यानंतर घरात खळबळ उडाली. सगळ्यांना नव्या नवरीवर शंका आली आणि त्यांनी तिला महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर उभे केले.

इतर बातम्या - मुंबईत कॉन्स्टेबलने केला टॅक्सी चालकावर बलात्कार, कारण आहे 'रेड लाईट एरिया'

'तुमची बायको ही स्त्री नसून एक पुरुष आहे'

महिला कॉन्स्टेबलने नवरीचा तपास केला असता ती स्त्री नसून पुरुष असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं. या सत्याचा उलगडा झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबियांना धक्का बसला. यानंतर पोलिसांनी आरोपी पुरुषाला अटक केली. नवरी बनलेल्या पुरुषाचे नाव रिचर्ड तुमुशाबे असून त्याचे वय 27 वर्षे आहे.

इतर बातम्या - तुमचे पैसे सुरक्षित ठेवा, RBI ने जारी केले ATM आणि क्रेडिट कार्डांचे नवे नियम

तुमुशाबे याच्यासह पोलिसांनी त्यांच्या मावशीलादेखील अटक केले आहे. तीसुद्धा आरोपीसह मिळून चोरी करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मावशीनेच लग्नाची पूर्ण तयारी केली होती. दोघांनी डाव रचला होता की, लग्न करुन शेख मोहम्मद मुटुंबा यांच्या घरातील सर्व सामान चोरी करायचे. मात्र, आता पोलिसांनी त्यांना अटक केले आहे.

इतर बातम्या - ‘कॅज्युअल SEX साठी इच्छुक असशील तर संपर्क कर’, गायिकेनं डिजे डिप्लोला केला मेसेज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2020 07:41 PM IST

ताज्या बातम्या