'निसर्ग' चक्रीवादळासाठी लष्कर, जल आणि वायू सेना सज्ज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'निसर्ग' चक्रीवादळासाठी लष्कर, जल आणि वायू सेना सज्ज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या सीमेवर घोंगावणारे चक्रीवादळ आपल्या उंबरठ्यावर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 2 जून : चक्रीवादळाचा धोका पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किनारपट्टीजवळील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. या चक्रीवादळासाठी लष्कर, वायू आणि जलसेना तयार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधला होता महाराष्ट्राच्या सीमेवर घोंगावणारे चक्रीवादळ आता  आपल्या उंबरठ्यावर आलं आहे. अलिबाग येथे वादळ धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ कदाचित मोठं असू शकतं. 100 ते 115 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. प्रार्थना हीच आहे की हे वादळ हवेत नाहीसं व्हावं. जे काही दिसतंय त्यावर हे वादळ उद्या दुपारपर्यंत किनाऱ्यावर धडकेल. उद्या किनारपट्टी भागात हे वादळ परिणाम करेल. आपण सज्ज आहोत. एनडीआरएफच्या अनेक तुकड्या तैनात केल्या आहेत.

उद्धव ठाकरे LIVE - मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार किनारपट्टीच्या भागातल्या नागरिकांनी घरातच राहणं आवश्यक आहे. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा फोन आला होता, त्यांनी केंद्र सरकारसोबत असल्याचं सांगितलं आहे. 3 व 4 हे दोन्ही दिवस महत्त्वाचे आहे. दोन्ही दिवस घरात थांबा. कोणीही घराबाहेर पडू नका.

काय काळजी घ्याल

- वादळाचा सामना करायला राज्य सज्ज

- प्राणहानी होऊ नये अशी तयारी केली आहे.

- गेल्या काही वर्षांत आलं नव्हतं असं तीव्र वादळ

- अलिबागला धडकण्याची शक्यता असली तरी मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत सगळ्यांनीच काळजी घ्यायची आहे.

- काही ठिकाणचा वीजप्रवाह खंडित करावा लागेल

- गरज नसेल तिथे विजेची उपकरणं वापरू नका

कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या मुंबईवर आता चक्रीवादळाचं नवं संकट आलं आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी वादळ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वादळाचं चक्रीवादळात रुपांतर झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. चक्रीवादळाचं निसर्गाचे वारे ताशी सुमारे 100 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. बीएमसी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील राज्य सरकारी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी केली आहे. याबाबत आयुक्तांनी नियमावली जारी केली आहे.

हे वाचा-'निसर्ग' चक्रीवादळ उद्या सकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर धडकणार

First published: June 2, 2020, 8:11 PM IST

ताज्या बातम्या