सरकारी जाहिरातीमधल्या 'लाभार्थी' शब्दाला माझा आक्षेप- उद्धव ठाकरे

सरकारी जाहिरातीमधल्या 'लाभार्थी' शब्दाला माझा आक्षेप- उद्धव ठाकरे

''राज्य सरकारकडून सध्या मी लाभार्थी ची जाहिरात सुरू आहे पण लाभार्थी या शब्दावरच माझा आक्षेप आहे कारण कुणी लाभार्थी झालं म्हणजे त्यांच्यावर उपकार केले जात नाहीत त्यामुळं हे सरकार आपलं सरकार असूच शकत नाही'', अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर केली. उद्धव ठाकरे सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत.

  • Share this:

24 नोव्हेंबर, कोल्हापूर : ''राज्य सरकारकडून सध्या मी लाभार्थी ची जाहिरात सुरू आहे पण लाभार्थी या शब्दावरच माझा आक्षेप आहे कारण कुणी लाभार्थी झालं म्हणजे त्यांच्यावर उपकार केले जात नाहीत त्यामुळं हे सरकार आपलं सरकार असूच शकत नाही'', अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर केली. उद्धव ठाकरे सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरीमध्ये आज ठाकरे यांची जाहीर सभा झाली यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारने जाहिरातींसाठी 1100 कोटी रुपये खर्च केले मग सिंचनासाठी आणि जनतेच्या विकासासाठी पैसा का खर्च करत नाही असा सवाल विचारत ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी सत्तेला लाथ मारून रस्त्यावर उतरेन, असं म्हटलंय.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यातील दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत डांबराचा खर्च अर्धा लावणारे मंत्री अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. तसंच शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटी बाबत बोलताना या बैठकीत 'एमसीए' बद्दल चर्चा झाली म्हणून सांगतात पण शेतकर्‍यांबाबत का नाही झाली, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

First published: November 24, 2017, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading