उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा'वर बंद दाराआड चर्चा !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षावर जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2018 08:09 PM IST

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा'वर बंद दाराआड चर्चा !

15 फेब्रुवारी, मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षावर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नाणार रिफायनरी विरोधातल्या ग्रामस्थांचं शिष्टमंडळ तसंच उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, वैभव नाईक, राजन साळवी आणि सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील वर्षावरील बैठकीला उपस्थित आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे नानार प्रकल्पाला असहमती दर्शवणाऱ्या पत्रांचे गठ्ठे सुपूर्त केले. आणि या प्रकल्पाला शिवसेनेचाही विरोध असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे या दोन प्रमुख नेत्यांच्या आगामी निवडणुकीतील फेरयुतीबाबत तर काही चर्चा झाली नाहीना,यावरून राजकीय तर्कवितर्कांना उधान आलंय. कारण उद्धव ठाकरेंनी यापुढे स्वबळावर निवडणुका लढवण्याचं यापूर्वीच जाहीर केलंय, तरीही भाजपकडून पुन्हा युती करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातच मध्यंतरी अमित शहा यांनी शिवसेनेच्या खासदारांकडे फेरयुतीसंबंधीचा प्रस्ताव दिला होता. उद्धव ठाकरेंकडून मात्र, फेरयुतीबाबत अजूनही कोणतीच स्पष्टता आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2018 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...