12 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

12 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ इथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजनचा कार्यक्रम आज होतोय.

  • Share this:

23 जून : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ इथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजनचा कार्यक्रम आज होतोय. या ठिकाणी ठाकरे आणि राणे हे दोघेहीजण तब्बल 12 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येतील.

या कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार आहेत. राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील स्थानिक आमदार म्हणून नितेश राणे आणि विधान परिषद आमदार नारायण राणे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. त्यामुळे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे.

नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.त्यामुळे सगळ्यांच लक्ष आजच्या या कार्यक्रमाकडे लागलं आहे.

First published: June 23, 2017, 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading