News18 Lokmat

वेळ जुळत नाही दोन दिवसांनी भेटू, उद्धव ठाकरे, मुनगंटीवारांची भेट लांबणीवर!

दोन्ही नेत्यांच्या वेळा जुळत नसल्याने भेट लांबणीवर, सुधीर मुनगंटीवार आज जाणार होते मातोश्रीवर.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2018 03:07 PM IST

वेळ जुळत नाही दोन दिवसांनी भेटू, उद्धव ठाकरे, मुनगंटीवारांची भेट लांबणीवर!

मुंबई,ता.16 एप्रिल: शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांची आजची मातोश्रीवरील नियोजीत भेट दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आलीय. दोन्ही नेत्यांच्या वेळा जुळत नसल्याने आजची भेट लांबणीवर पडल्याचं मुनगंटीवार यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.

आधी ही भेट आजच होणार होती असं भाजपकडून सांगितलं जात होतं तर सेनेकडून उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना वेळच दिली नसल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर हा खुलासा करण्यात आलाय.

नाणारचा प्रश्न, भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचा होत असलेला प्रयत्न या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालं होतं. पुलाखालून बरच पाणी वाहून गेल्यानं भाजपची भूमिका आता नरमाईची झालीय तर आता मुका घेण्याचा प्रयत्न केला तरीही काही फायदा नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं यापुढे कुठल्या राजकीय घडमोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...